सरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला

सरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला

विरोधकांनी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरूद्ध दिलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावाच हिरवा कंदील देण्यास राष्ट्रपतींनी नकार दिला आहे.

  • Share this:

23 एप्रिल : कॉग्रेसनं सादर केलेला सरन्यायाधीशांवर महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग चालविण्याची नोटीस काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी शुक्रवारी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना दिली होती. पण ती नोटीस उपराष्ट्रपतींनी फेटाळली आहे.

विरोधकांनी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरूद्ध दिलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावाच हिरवा कंदील देण्यास राष्ट्रपतींनी नकार दिला आहे. पण दरम्यान त्याआधीच काँग्रेसच्या नेत्यांकडून असं सांगण्यात आलं होतं की, जर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातला महाभियोगाच्या प्रस्ताव नकारला तर काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्यामुळे आता काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाभियोग प्रस्तावावर एकूण 71 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत ज्यात 7 निवृत्त सदस्यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेस, एनसीपी, सीपीआय (एम), एसपी, बसपा आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल)च्या सदस्यांनी महाभियोगाच्या नोटीसवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

 

First published: April 23, 2018, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading