भाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद

भाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून मोदी सरकारला झटका दिला आहे.

  • Share this:

लखनऊ, 20 जानेवारी: आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. निवडणुका जवळ आल्या असताने राम मंदिर प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारवर देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून राम मंदिरासाठी कायदा करण्यासाठी दबाव येत आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी याच मुद्यावरून मोदी सरकारला झटका दिला आहे.

राम मंदिरासाठी मोदी सरकार कायदा करेल असे आम्हाला वाटत होते. त्यासाठी आम्ही आग्रह देखील केला होता. पण आता वाटत नाही की हे सरकार कायदा करु शकले. कमीत कमी या कार्यकाळात तर कायदा शक्य नाही. यासाठी आम्ही आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहोत. यासाठी साधू संतांसोबत चर्चा करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धर्म संसदेत संत पुढची दिशा निश्चित करतील, असे कुमार म्हणाले.

... तर काँग्रेसला पाठिंबा देऊ

हिंदुत्व आणि राम मंदिरासाठी जे कोणी सकारात्मक संकेत देतील आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू, असे कुमार यांनी सांगितले. VHP काँग्रेस सोबत जाणार का या प्रश्नावर कुमार म्हणाले, आम्ही काँग्रेस सोबत जाऊ शकतो. पण त्यासाठी त्यांनी प्रथम स्वत:चे दरवाजे आमच्यासाठी खुले करावेत. काँग्रेसने दरवाजे आमच्यासाठी बंद केले आहेत. जर काँग्रेसने निवडणुकीच्या जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्मितीचा समावेश केला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे कुमार म्हणाले.

काँग्रेसमुळे कोर्टात अडकले प्रकरण...

काँग्रेसला पाठिंबा देण्यासंदर्भात बोलताना कुमार यांनी त्यांच्यावर टीका देखील केली. राम मंदिराचा मुद्दा कोर्टात अडकवण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांनी हे प्रकरण कोर्टातच अडकेल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सरन्यायाधिशांवर देखील दबाव टाकल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सोबत जाणार की नाही?

परिषद भाजपसोबत असेल की नाही याबाबतचा अंतिम निर्णय संत घेतील, असे आलोक कुमार म्हणाले. अर्थात भाजप शिवाय अन्य कोणता पक्ष हिंदुत्व आणि राम मंदिराचा विचार करेल असे दिसत नाही.

2025मध्ये पूर्ण होणार राम मंदिर

आम्हाला आशा वाटते की 2025पर्यंत राम मंदिर पूर्ण होईल. देशातील जनतेची इच्छा आहे की राम मंदिर व्हावे. यासाठी आम्ही सरकारकडे आग्रह धरू, असे कुमार म्हणाले.

मी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...? एकनाथ खडसे

First published: January 20, 2019, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading