प्रवीण तोगडिया रडत रडत म्हणाले 'माझा एन्काऊंटर करण्याचा कट'

प्रवीण तोगडिया रडत रडत म्हणाले 'माझा एन्काऊंटर करण्याचा कट'

मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काऊंटर करण्याचाही प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी पत्रकार परिषदेत केला.

  • Share this:

16 जानेवारी : अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर आता थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काऊंटर करण्याचाही प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी पत्रकार परिषदेत केला. हे सगळं बोलत असताना तोगडियांना रडू कोसळले. हिंदुंच्या राममंदिरासंबंधीच्या मागण्या, गोहत्याबंदी संदर्भातील मागण्या आणि इतर मागण्याही मी उचलत होतो. पण तितेही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. हे

'राजस्थानमधे माझ्याविरोधात एकही केस नाही किंवा कुठलंही वॉरंट नाही पण तरीही विचारपूस केली तेव्हा कळलं की त्यांच्याकडे माझ्याविरोधात अरेस्ट वॉरंट आहे. 20 वर्षांआधीच्या माझ्या जुन्या केसेस उकरुन काढल्या जात आहेत. असंही तोगडिया म्हणाले.

'मी परवा रात्री दीड वाजता मुंबईतून अहमदाबादेत परतलो असता तेव्हा एका व्यक्तीनं मला सांगितलं की तुमचा एन्कांऊटर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तुम्ही इथून निघून जा.' असा गंभीर आरोप तोगडिया यांना पत्रकार परिषदेत केला. संक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलीस अटक वॉरंट घेऊन माझ्याकडे आले. हा हिंदुचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. याकरता माझ्याविरोधात न्यायभंगाच्या केसेसही लावल्यात आल्या आहेत.

First published: January 16, 2018, 12:33 PM IST

ताज्या बातम्या