हैदराबाद, 29 नोव्हेंबर : सध्या ट्विटरवर #RIPPriyankaReddy हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हैदराबादच्या प्रियंका रेड्डीला न्याय मिळावा यासाठी ही मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. पशु चिकित्सक असलेल्या प्रियंकाचा जळालेला मृतदेह शादनगरच्या जवळ सापडला. तिच्यावर बलात्कार झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. रंगारेड्डी परिसरात स्थानिकांनी प्रियंकाला न्याय मिळावा अशी मागणी करत कँडल मार्च काढणार असल्याचं सांगितंलं आहे.
दरम्यान, प्रियंका रेड्डीने तिच्या हत्येपूर्वी बहिणीला फोन केला होता. त्यावेळी आपली गाडी नादुरुस्त झाली आहे. मला भिती वाटत आहे असं म्हटलं. एवढं बोलणं झाल्यावर तिचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रियांकाचा थेट जळालेला मृतदेह सापडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रियंका बुधवारी कोल्लारु इथे पशु चिकित्सालयात गेली होती. तिने स्कूटी शादनगर टोल प्लाझाजवळ पार्क केली होती. रात्रीच्या वेळी निघताना गाडी पंक्चर झाल्याचं तिला समजलं. तेव्हा प्रियंकाने बहिणीला फोन करून गाडी पंक्चर झाल्याची माहिती दिली. तेव्हा आपल्याला भीती वाटत असल्याचं बहिणीला सांगितलं. त्यावेळी बहिणीने प्रियंकाला टोल प्लाझाला जाऊन तिथून कॅबने येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा प्रियंकाने कोणीतरी मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं आणि फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ झाला. कुटुंबीयांनी टोल प्लाझाच्या परिसरात प्रियांकाचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. सकाळी शादनगरजवळ तिचा मृतदेह आढळला. तिचे कपडे घटनास्थळापासून काही अंतरावर सापडल्याने बलात्कारानंतर खून झाल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.
Dr. Priyanka Reddy's found brutally murdered & charred to death after she was stranded in Hyderabad outskirts
— Geetika Swami (@SwamiGeetika) November 29, 2019
Grieving family demands death penalty to perpetrators, Nothing less will be a denial to justice
#RIPPriyankaReddy #JusticeForPriyankaReddy #PriyankaReddy pic.twitter.com/2D8bO3Hxty
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. बुधवारी रात्री एक तरुण प्रियंकाची गाडी घेऊन 9.30 च्या सुमारास त्याच्याकडे आला असल्याचं शमसेर आलम नावाच्या मेकॅनिकने सांगितलं. तरुणाने गाडी त्याच्याकडे सोडली आणि निघून गेला अशी माहिती मेकॅनिकने पोलिसांना दिली.
प्रियंकाच्या खूनाचा उलगडा करण्यासाठी हैदराबाद पोलिस सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करत आहेत. याशिवाय प्रियंकाच्या फोनवर कोणाचे कॉल आले याचाही तपास केला जात आहे. पोलिस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने प्रियंकाची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आला. सध्या या प्रकऱणाचा तपास सुरू आहे.