Home /News /national /

राजकीय विश्लेषणाचे उर्ध्वयू, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांची प्रकृती गंभीर, ICU मध्ये दाखल

राजकीय विश्लेषणाचे उर्ध्वयू, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांची प्रकृती गंभीर, ICU मध्ये दाखल

राजकीय विश्लेषण असो वा जायका इंडिया का हा कार्यक्रम असो. विनोद दुवा यांच्या मुद्देसूद मांडणी आणि अमोघ वक्तृत्व शैलीने नेहमीच समोरच्याला निरूत्तर केलं आहे.

    नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : वरिष्ठ पत्रकार विनोद दुवा (Vinod Dua) सध्या आयसीयूमध्ये भरती आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. विनोद दुवांची मुलगी आणि अभिनेत्री मल्लिका दुवाने (Mallika Dua) याबाबत माहिती दिली. दुवा यांना या वर्षाच्या सुरुवातील कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हिंदी पत्रकारितेतील बहुचर्चित नाव म्हणून विनोद दुवा (67) यांच्याकडे पाहिलं जातं. अमोघ वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. त्यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही सारख्या वृत्त वाहिन्यांमध्ये राजकीय विश्लेषण केलं आहे. 1991 मध्ये प्रसार भारतीवर त्यांनी निवडणुकांचं विश्लेषणही केलं होतं. (Veteran journalist Vinod Dua in critical condition admitted to ICU) विनोद दुवा यांना 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी त्यांनी नेहमी आवाच उचलला, याशिवाय सरकारच्या चुकीच्या कामाबद्दल त्यांना धारेवरही धरलं. त्यानंतर बराच काळ त्यांनी 'जन गन मनकी बात' या युट्यूबवरील कार्यक्रमातूही सद्यस्थितीतील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आणि निर्भिडपणे आपलं मत मांडलं. याशिवाय 'द वायर' सारख्या वृत्त संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांनी आपलं पत्रकारितेचं काम सुरूच ठेवलं होतं. काही वर्षांपूर्वी Me Too प्रकरणातही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. जायका इंडिया का या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात भ्रमंती विनोद दुवा हे एनडीटीव्हीमध्ये असताना त्यांनी जायका इंडिया का या क्रार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणची खाद्यभ्रमंती घडवली. त्यांच्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे एखाद्या ठिकाणच्या खाद्यपदार्थाबद्दल सांगताना ते तेथील भौगोलिक परिस्थिती, संस्कृती याचीही ओळख करून देत होते. आजही जायका इंडिया का याचे कार्यक्रम यूट्यूबवर पाहिले जातात. दूरदर्शन आणि एनडीटीव्हीसारख्या वृत्त वाहिन्यामध्ये काम केलेले आणि हिंदी पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे 67 वर्षीय विनोद दुवा यांची पत्नी पद्मावती चिन्ना दुवा यांचं जून महिन्यात त्यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर विनोद दुवा खचले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या