अखेर लालकृष्ण अडवाणींनी सोडलं मौन, तिकीट कापल्यानंतर लिहिला ब्लॉग

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 08:26 PM IST

अखेर लालकृष्ण अडवाणींनी सोडलं मौन, तिकीट कापल्यानंतर लिहिला ब्लॉग

नवी दिल्ली, 4 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.  'सर्वप्रथम देश, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत्व' ही माझ्या आयुष्याची मार्गदर्शक तत्त्व आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अडवाणींनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, '6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीला आपला वर्धापन दिवस साजरा करणार आहे.  स्वतःच्या आतमध्ये डोकावण्याची भाजपमधील सर्वांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे'.

शिवाय, त्यांनी राष्ट्रवादाचा मुद्दादेखील मांडला आहे. याबाबत परखड मत व्यक्त करत त्यांनी म्हटलं आहे की, 'राजकीय विरोध दर्शवणारे देशद्रोही ठरू शकत नाही. भारतीय लोकशाही ही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करते. ज्यांनी आमच्या विचारांशी सहमती दर्शवली नाही, त्यांना भाजपनं कधीही आपला राजकीय शत्रू मानले नाही. तर केवळ त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहिलं आहे. पक्षानं प्रत्येक नागरिकाला आपला प्रत्येक विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मग तो विचार वैयक्तिक पातळीवरील असो किंवा राजकीय व्यासपीठावरील असो.'


Loading...
असा झाला लालकृष्ण अडवाणींचा पत्ता कट

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं गांधीनगरमधून तिकीट कापत त्यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तिकीट देण्यात आलं. त्यामुळे भाजपच्या निर्णयावर काही स्तरातून आश्चर्यदेखील व्यक्त करण्यात आलं. पण, सर्वात मोठी बाब म्हणजे वाढत्या वयाचा विचार करता भाजपनं तिकीट कापल्याचं बोललं जात आहे. शिवाय, लालकृष्ण अडवाणी यांना काही पर्यायदेखील देण्यात आले होते. पण, अडवाणी मात्र निवडणुकीमध्ये लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे अखेर लालकृष्ण अडवाणी यांची उमेदवारी नाकारण्यात आली.

काय होते अडवाणींसमोर पर्याय?

75 वय वर्षे झालेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय झाला होता. पण, तीन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर हा निर्णय काहीसा पुढे ढकलला गेला. कलराज मिश्र यांच्यानंतर मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत निर्णय झालेला नव्हता. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाजप नेतृत्वाला होती. पण, लालकृष्ण अडवाणी मात्र त्यासाठी तयार नव्हते.

याबाबत लालकृष्ण अडवाणी यांनी अनेक निरोप पाठवले गेले. त्यांची समजूत काढण्यात आली. शिवाय सक्रीय राजकारणातून बाहेर पडल्यानंतर काही अटी असल्यास त्यावर देखील पक्ष चर्चा करायला तयार असल्याचं सांगण्यात आलं. कुटुंबातील एका व्यक्तीला राजकारणात आणण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला. पण, अडवाणी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे पक्षानं कठोर निर्णय घेत गांधीनगरमधून लालकृष्ण अडवाणी यांचं तिकीट कापलं.

VIDEO: अ‍ॅसिड हल्ल्याबाबत बोलताना जया प्रदा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...