नवी दिल्ली 2 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस कैलास विजवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं. हिंदी आणि बंगाली चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने ठसा उमटवला होता. चॅटर्जी या भाजपकडून लोकसभेची निवडणुकही लढवण्याची शक्यता आहे.
2004मध्ये चॅटर्जी यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्या सक्रिय राजकारणातून काहीशा दूर झाल्या होत्या. कच्चे धागे, बेनाम, बालिका वधू, परिणीता अशा चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. राजेश खन्ना, शशी कपूर,जीतेंद्र, संजीव कुमार आणि विनोद खन्नांसोबतची त्यांची जोडी चांगलीच गाजली होती.
पश्चिम बंगालमध्ये भाजपसध्या मोठा जोर लावत आहे. त्यामुळे मोसमी चॅटर्जींच्या प्रवेशामुळे भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आपण प्रभावित झाल्यानं भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितंलं.
Delhi: Veteran actor Moushumi Chatterjee joins BJP in presence of party National General Secretary Kailash Vijayvargiya pic.twitter.com/trLlJXuFPX
— ANI (@ANI) January 2, 2019