गुरमित राम रहिम यांच्यावरील खटल्यावर उद्या सुनावणी; चंदीगढला छावणीचं स्वरुप

गुरमित राम रहिम यांच्यावरील खटल्यावर उद्या सुनावणी; चंदीगढला छावणीचं स्वरुप

डेरा सच्चा सौदाचे सुमारे ५० हजार समर्थक पंचकुलामध्ये पोहोचले आहेत. पंचकुलच्या डेरा सच्चा सौदा आश्रमात पेट्रोल आणि हत्यारं साठवल्याचा पुरावा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • Share this:

चंदीगढ,24 ऑगस्ट: डेरा सच्चा सौदाचे गुरमित राम रहिम यांच्याविरोधातील बलात्काराच्या खटल्यावर सीबीआयचे विशेष न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.यामुळे चंदीगढमध्ये सुरक्षेचे चोख बंदोबस्त करण्यात आले असून चंदीगढला छावणीचे स्वरूप आले आहे.

15 वर्षांपूर्वी हरयाणाच्या आश्रमात दोन महिलंवर बलात्कार करण्याचा आरोप गुरुमित राम रहिम यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालय निकाल सुनावणार आहे. मात्र निकालाचा दिवस जवळ येत असतानाच पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. उद्या निकाल येणार असला तरी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. डेरा सच्चा सौदाचे सुमारे ५० हजार समर्थक पंचकुलामध्ये पोहोचले आहेत. पंचकुलच्या डेरा सच्चा सौदा आश्रमात पेट्रोल आणि हत्यारं साठवल्याचा पुरावा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सुरक्षेसाठी  न्यायालयाच्या आवारात सुमारे ५०० पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहे. तर शहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरातील आपातकालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.   पंजाबमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. शहरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलीय. पंजाब हरयाणातल्या अनेक शाळाही उद्या बंद राहणार आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांनी कायद्याचे उल्लंघन केलेच तर चंदीगढ स्टेडियमचा वापर तात्पुरता जेल म्हणून करण्यात येणार आहे.

त्यामुळे या खटल्याचा काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

First published: August 24, 2017, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading