S M L

व्यंकय्या नायडूंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

व्यंकय्या नायडू हे देशाचे 13वे उपराष्ट्रपती आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Aug 11, 2017 10:50 AM IST

व्यंकय्या नायडूंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

नवी दिल्ली, 11 आॅगस्ट : व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची  शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. व्यंकय्या नायडू हे देशाचे 13वे उपराष्ट्रपती आहेत.

5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता. व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली होती. तर 11 मतं बाद गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 10:50 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close