या ठिकाणची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार?

या ठिकाणची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार?

लोकसभा निवडणूक तर झाली, भाजपला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. मोदी सरकारचं कामही सुरू झालं. तरीही देशात एका ठिकाणची निवडणूक राहिली होता. त्यामुळे 23 मे ला 542 जागांचाच निकाल आला होता.

  • Share this:

वेल्लोर, 4 जुलै : लोकसभा निवडणूक तर झाली, भाजपला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. मोदी सरकारचं कामही सुरू झालं. तरीही देशात एका ठिकाणची निवडणूक राहिली होता. त्यामुळे 23 मे ला 542 जागांचाच निकाल आला होता.

लोकसभा निवडणुकीतली ही 543 वी जागा आहे, वेल्लोरची. तामिळनाडूमधल्या या वेल्लोर मतदारसंघात पैशाच्या अतिवापरामुळे निवडणूकच रद्द झाली होती. आता इथे 5 ऑगस्टला मतदान होणार आहे. याचा निकाल 9 ऑगस्टला येईल.

निवडणूक आयोगाने इथली निवडणूक रद्द करण्याची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इथली निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले. वेल्लोरमध्ये 18 एप्रिलला मतदान होणार होतं.

इथे निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जात होते. प्राप्तीकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी इथे छापे मारले. द्रमुकचे खजिनदार दुरई मुरुगन यांच्या घरी छापा घालून त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे जप्त केले होते. त्यानंतर ही निवडणूक रद्द करण्यात आली.

जिओचा धमाका: 200 रुपयात मिळवा अनलिमिडेट फायदे!

तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रुमक यांच्या युतीमध्ये जागावाटपात ही जागा द्रमुककडे गेली होती. तर भाजप आणि अण्णाद्रमुक यांच्या युतीमध्ये ही जागा अण्णाद्रमुक लढवत होतं. द्रमुकचे उमेदवार कादिर आनंद विरुद्ध अण्णाद्रमुकचे उमेदवार ए. सी.षण्मुगम अशी ही लढत होती.

वेल्लोरची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची पूर्ण निवडणूक झाली, असं म्हणता येईल. त्याचवेळी लोकसभेचं पूर्ण चित्र समोर येणार आहे.

===============================================================================================

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...