बर्फामुळे रस्त्यावर जीप झाली आऊट ऑफ कंट्रोल, घडला मोठा अपघात VIDEO VIRAL

बर्फामुळे रस्त्यावर जीप झाली आऊट ऑफ कंट्रोल, घडला मोठा अपघात VIDEO VIRAL

एक जीप रस्त्यावरून जाताना निसरड्या रस्त्यांमुळे आपला मार्ग बदलते आणि थेट पादचाऱ्यांवर जाऊन धडकते.

  • Share this:

श्रीनगर : देशभरात थंडी जाणवू लागली आहे. श्रीनगरमध्ये थंडीच्या कडाक्याने गेल्या तीन वर्षीतील रेकॉर्ड मोडला आहे. श्रीनगरचं तापमान मायनस 8.8 डिग्री सेल्सियसवर पोहचलं होतं. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीदेखील होत आहे. बर्फवृष्टीमुळे तेथील रस्ते निसरडे झाले आहेत. रस्ते निसरडे झाल्याने गाड्या रस्त्यावरून घसरण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक जीप रस्त्यावरून जाताना निसरड्या रस्त्यांमुळे आपला मार्ग बदलते आणि थेट पादचाऱ्यांवर जाऊन धडकते.

हा व्हिडीओ कुपवाडा येथील आहे. जीप रस्त्यावरून घसरून थेट पादचाऱ्यांना धडकली. रस्त्यावरून चालणारे अनेक पादचारी जीप धडकल्याने त्यावर आदळल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. बर्फामुळे रस्त्यावर जीप आऊटऑफ कंट्रोल झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्याचा इतर ठिकाणचा संपर्क तुटला होता. चार ते पाच फूटांपर्यंत बर्फ जमा झाल्याने तेथील जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येथे गर्दी करत आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: February 1, 2021, 1:26 PM IST

ताज्या बातम्या