गडचिरोली, 25 एप्रिल : माओवाद्यांनी (maoist) पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. भारत बंदच्या पूर्व संध्येला माओवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली. छत्तीसगडच्या(Chhattisgarh) सुकमा (Sukma) जिल्ह्यात 80 लाख रुपयांची सात वाहने माओवाद्यांनी जाळली आहे. माओवाद्यांनी भारत बंदचे आवाहन केले असून दहशत पसरवण्यासाठी हे कृत केले आहे.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी हैदोस घातला आहे. दंडकारण्यात माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या प्रहार अभियानाच्या विरोधात माओवाद्यांनी 26 एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे भारत बंदच्या पूर्व संध्येला माओवाद्यांची जाळपोळ करून इशारा दिला आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 80 लाख रुपयांची सात वाहने माओवाद्यानी जाळली आहे. दहशत पसरवण्यासाठी एर्राबोर ते दरभागुडा दरम्यान सशस्त्र माओवाद्यांनी सात टिप्पर जाळले आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यासह दंडकारण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान या बंदच्या पार्श्वभुमीवर रविवारी संध्याकाळी लगतच्या तेलंगणातील मंचेरियाल जिल्हयाचे पोलीस आयुक्त सत्यनारायण यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील प्राणहीता पुल परिसरात येऊन सीमावर्ती भागाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन माओवाद्याच्या दोन राज्याच्या सीमावर्ती भागातल्या हालचाली रोखण्यासाठी संपर्क वाढवण्यासह संयुक्त अभियान राबवण्याच्या विषयावरही चर्चा झाली. या परिसरात ग्रेहाउन्ड या विशेष पथकाच्या 30 तुकड्या दोन दिवसांपासून माओवाद्यांविरोधी अभियान करत असल्याची माहिती तेलंगाणा पोलिसांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देऊन सीमेवरील पोलीस ठाण्याच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: माओवादी