मराठी बातम्या /बातम्या /देश /

भीमा कोरेगाव प्रकरणी अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगाव प्रकरणी अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत वरवरा राव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत वरवरा राव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत वरवरा राव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अखेर वरवरा राव यांना दिलासा मिळाला आहे. वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दीड वर्षांनंतर 84 वर्षीय वरवरा राव (Varvara rao granted bail) यांना वैद्यकीय कारणावर जामीन देण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये वेगवेगळ्या आरोपांखाली वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत वरवरा राव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. राव यांनी जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही. त्यामुळे या निकालाविरुद्ध राव यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अखेरीस 84 वर्षीय राव यांना तब्येतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अरुण परेरा ,वर्णन गोंसालवीस, सुधा भारद्वाज ,हौत्म नवलखा आणि वरवरा राव या विचारवंतांना अटक करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी परेरा, भारद्वाज, गोंसालविस यांना अटक केली होती. त्यानंतर वरवरा राव यांनाही अटक केली होती. (तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत व्यक्त झाली करीना कपूर, वहिनी आलिया भट्टबाबत म्हणाली...) वरवरा राव यांच्यावर नक्षलवादी संघटनेतील वरिष्ठ लोकांशी संबंध ठेवणे, नेपाळ आणि मणिपूर येथून दारुगोळा खरेदीचं नियोजन करणे, लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकण्याचा कट करणे, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. काय आहे कोरेगाव भीमा प्रकरण? भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं होतं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजणाने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समाजाची वीण उसवली गेली. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थितीत होते. दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा याठिकाणी मोठा हिंसाचार उसळला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या