पीलीभीत (उत्तर प्रदेश), 11 जून : भाजपचे नेते वरुण गांधी हे यावेळी पीलीभीतमधून लोकसभा निवडणूक लढले आणि खासदार झाले. आता वरुण गांधी पीलीभीतच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी सगळ्यांना आश्चर्य वाटेल असं वक्तव्य केलं. ते नेमकं कुणाला उद्देशून बोलले ते माहीत नाही पण वरुण गांधींनी केलेलं विधान मात्र धक्कादायक आहे.
'मला मारणं तर दूरच पण कुणामध्येही मला हातही लावायची हिंमत नाही', असं वरुण गांधी एका सभेत म्हणाले. जेव्हा वरुण गांधी आपली शस्त्रं बाहेर काढले तेव्हा कसलेले बडेबडे शिकारी त्यांच्या गुहेत निघून जातील, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हानही दिलं.
रोख नक्की कुणाकडे?
भाजपचे खासदार वरुण गांधी त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत पण हे वक्तव्य करताना वरुण गांधींनी कुणाचंही नाव घेतलं नाही. यापेक्षा आणखी काही बोलायला मात्र त्यांनी नकार दिला.
गेल्या काही दिवसात भाजपच्या एका आमदारांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. आपण 'वरुण गांधी झिंदाबाद' असं म्हणणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. वरुण गांधी यांनी याच आमदारांना हे आव्हान दिलं असावं, असं बोललं जात आहे.
असं असलं तरी वरुण गांधींनी हे विधान नेमकं कुणाला उद्देशून केलं याचा अर्थ कळू शकलेला नाही.
मतदारसंघांची अदलाबदल
वरुण गांधी आणि मनेका गांधी या दोघांनीही यावेळी लोकसभा निवडणूक लढवली. यावेळी या दोघांच्या मतदारसंघात मात्र बदल करण्यात आला होता. वरुण गांधींनी पीलीभीतमधून लढत दिली तर मनेका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून लढल्या.
पीलीभीतमध्ये वरुण गांधी सपा- बसपा गठबंधनच्या उमेदवाराचा पराभव करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
मंत्रिपद नाही
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मनेका गांधी यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तुम्हाला मंत्रिपद का मिळालं नाही, असा प्रश्न जेव्हा मनेका गांधींना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर देणं टाळलं होतं. सुलतानपूरची जनताच तुम्हाला हे उत्तर देऊ शकेल, असं मनेका गांधी म्हणाल्या. वरुण गांधींच्या प्रश्नावरही त्यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलं होतं.
==================================================================================================
VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा