कोरोनाबाबत सगळ्यात मोठी अपडेट! भारतात चीन नाही तर युरोपमधून पसरला व्हायरस

कोरोनाबाबत सगळ्यात मोठी अपडेट! भारतात चीन नाही तर युरोपमधून पसरला व्हायरस

यावर्षी फेब्रुवारीमध्ये शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या नवीन प्रकाराला SARS-CoV-2 असे नाव दिले.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: जगभरात सध्या कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) संशोधन केले जात आहे. कोव्हिड-19 नावाचा हा व्हायरस किती धोकादायक आहे किंवा रुग्णांचे किती नुकसान होत आहे, याचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करीत आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या नवीन प्रकाराला SARS-CoV-2 असे नाव दिले. असे म्हटले जात आहे की भारत कोरोनाचे संक्रमण युरोपमधून आलेल्या प्रवाशांमुळे झाला. मुख्य म्हणजे कोरोनाची सुरुवात चीनमधील वुहानमधून झाली होती, मात्र भारतात हा व्हायरस युरोपमधून आलेल्या प्रवाशांमुळे झाला असल्याचे समोर आले आहे.

बायोटेक्नॉलॉजी विभागाने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना एक रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार असे म्हटले जात आहे की, भारतातील बहुतेक कोरोनाचे स्ट्रेन हे युरोप आणि सौदी अरेबियातून आले आहेत. तर, जानेवारीच्या सुरूवातीस भारतातील कोरोनाचे काही व्हेरिएंट चीनमधूनही आले. अभ्यासात असेही आढळले आहे की SARS-Cov-2 चे D164G व्हेरिएंट आता कमी झाले आहे. हे व्हेरिएंट दिल्लीत जास्त होते, म्हणूनच आता कोरोनाचे ट्रान्समिशन येथे कमी होत आहे.

वाचा-भारताचे व्हेंटिलेटर्स विदेशात वाचवणार COVID रुग्णांचे प्राण, निर्यातीला परवानगी

लॉकडाऊनचा फायदा

लॉकडाऊनचा देशाला मोठा फायदा झाला असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे. विशेषत: मार्च ते मे दरम्यान लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकला नाही. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे देशभरात बंद होती. अशा परिस्थितीत, कोरोनाचे विविध व्हेरिएंट देशात पसरले नाहीत. शास्त्रज्ञांनी असा दावाही केला आहे की भारतासारख्या मोठ्या देशात कोरोना वेगवेगळ्या मार्गांनी लोकांवर परिणाम करीत आहे.

वाचा-‘अमेरिकेत 5 महिन्यात येणार COVID-19वर लस’, तज्ज्ञांच्या दाव्याने आशा वाढली

मृत्यूदर झाला कमी

आतापर्यंत देशात कोव्हिड-19 पासून बरे झालेल्या लोकांची संख्या 11 लाखांवर पोहोचली आहे, तर मृत्यूदर 2.15 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जूनमध्ये हा आकडा 3.33 टक्के होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की मार्चमध्ये लॉकडाऊनचा पहिला टप्पा लागू झाल्यापासून देशाचा मृत्यूदर प्रथमच कमी झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 2, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या