मोदींच्या समोर सायकल पंक्चर, तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द

मोदींच्या समोर सायकल पंक्चर, तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द

निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.

  • Share this:

वाराणसी, 01 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून समाजवादी पक्षातून लोकसभेसाठी उभे असलेले आणि बीएसएफमधून निलंबित केलेले तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.

आपला उमेदवारी अर्ज रद्द केल्यामुळे तेज बहादूर नाराद आहेत. 'माझा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द केला गेला. मला मंगळवारी सकाळी पुरावे देण्याचे आदेश दिले. मी आदेश सादर केले. पण तरीदेखील माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यामुळे मी आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार' असल्याचं तेज बहादूर म्हटले.

खरंतर, तेज बहादूर यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना बीएसएफमधून निलंबित केल्याची वेगवेगळी कारणं त्यांनी लिहिली होती. त्यामुळे तेज यांची तक्रार निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी तेज बहादूर यांना नोटीस पाठवली होती.

हेही वाचा : गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे, फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा - शरद पवार

पाठवलेल्या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी दिली होती वेळ

जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज यांना मे महिन्याच्या 1 तारखेपर्यंत उत्तर देण्याची वेळ दिली होती. वेळीच उत्तर नाही दिलं तर त्यांचा निवडणूक अर्ज रद्द होऊ शकतो असे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला तेज बहादूर यांनी वाराणसीतून स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर त्यांना समाजवादी पार्टीने तिकीट दिलं होतं. महाआघाडीतून तेज बहादूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभेच्या मैदानात होते.

दरम्यान, तेज बहादूर यांना उमेदवारी देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यात शालिनी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे एकीकडे निवडणूक आयोगाची नोटीस आणि दुसरीकडे शालिनी यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दिलेला नकार. यामुळे तेज बहादूर यांच्या अडचणी वाढल्या अशी चर्चा होती.

तेज बहादूर यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडून शालिनी यांची समजूत काढण्य़ाचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. शालिनी यादव या काँग्रेसच्या दिग्गज नेते श्यामलाल यादव यांच्या सून आहेत. 22 एप्रिलला त्यांनी काँग्रेमचा राजीनामा दिला आणि सपामध्ये प्रवेश केला.

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची भीषणता दाखवणारा पहिला VIDEO

First published: May 1, 2019, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading