News18 Lokmat

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत, रोड शोद्वारे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 08:46 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत, रोड शोद्वारे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

नवी दिल्ली, 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दौऱ्यामुळे वाराणसीला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. आज येथे ते भव्य रोड शो करून शक्तीप्रदर्शन देखील करणार आहेत. यानंतर 26 एप्रिलला पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आजच्या या रोड शोमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतेदेखील सहभागी होणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दल प्रमुख प्रकाश सिंग बादल यांच्यासह अनेक दिग्गज नेते रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. दुपारी 3 वाजता बनारस हिंदू विद्यापीठाच्या परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यापासून हा रोड शो सुरू होणार असून जगप्रसिद्ध दशाश्वमेघ घाट परिसरात रोड शोची सांगता करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक 2014मध्ये करण्यात आलेल्या रोड शोपेक्षाही आजचा रोड शो भव्य स्वरूपाचा व्हावा, यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते गंगा आरतीदेखील करणार आहेत. 26 एप्रिलला सकाळच्या सुमारास मोदी भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. यानंतर ते काल भैरव मंदिराचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना होतील.

शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार

पंतप्रधान मोदी 26 एप्रिलला सकाळी 11.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 वाजताची वेळ शुभ मोदींसाठी शुभ असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं आहे. दरम्यान, वाराणसीत लोकसभा निवडणुकीच्या सातवा आणि अंतिम टप्पा म्हणजे 19 मे रोजी मतदान होणार आहे. 23 मे रोजी निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत.


Loading...


वाचा अन्य बातम्या

VIDEO : साध्वीवरून राज ठाकरेंच्या भाजपला खडा सवाल

VIDEO : इंजिन तोंडाच्या वाफेवर चालतंय, फडणवीसांचा टोला

VIDEO 'श्रीलंकेतल्या स्फोटानंतर भारतालाही काळजी घेण्याची गरज'

SPECIAL REPORT : वाराणसीत मोदींच्या रॅलीला अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...