१६ वर्षांनंतर वाराणसी जेलमधून पाकिस्तानी कैद्याची सुटका, सोबत नेली भगवत गीता

१६ वर्षांनंतर वाराणसी जेलमधून पाकिस्तानी कैद्याची सुटका, सोबत नेली भगवत गीता

"मी पाकिस्तानी बंदी ज्याने १६ वर्ष भारताच्या जेलमध्ये घालवली. पण मला कधीच असं वाटलं नाही की मी भारतात शिक्षा भोगली."

  • Share this:

उपेंद्र द्विवेदी, प्रतिनिधी

04 नोव्हेंबर : वाराणसी मध्य कारागृहातून १६ वर्षांनंतर एका पाकिस्तानी कैद्याची सुटका करण्यात आली आहे. जलालुद्दीन या कैद्याची रविवारी मुक्तता करण्यात आली. पोलिसांच्या सुरक्षेत तो आपल्या देशात जाण्यास रवाना झाला आहे. ५ नोव्हेंबरच्या सकाळी त्याला वाघा बाॅर्डरवर पाकिस्तानी पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जलालुद्दीन कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने आपल्यासोबत भगवत गीता आणि एमएची डिग्रीसोबत नेली.

वाराणसीमध्ये १६ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध भागातील गरीबाबाद इथं राहणारा जलालुद्दीन उर्फ जलालू ला २००१ मध्ये कॅटोनमेंट भागात वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद कागदपत्रासह अटक केली होती. अटक झाल्यानंतर त्याची रवानगी वाराणसी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, जलालुद्दीनने हिंदी आणि उर्दूमध्ये पत्र लिहिले. यात तो म्हणतो, "मी पाकिस्तानी बंदी ज्याने १६ वर्ष भारताच्या जेलमध्ये घालवली. पण मला कधीच असं वाटलं नाही की मी भारतात शिक्षा भोगतोय. काही नेत्यांनी दोन्ही देशाला वेगळं केलं पण मन वेगळी करू शकले नाही. मला कारागृहातील इतर कैद्यांकडून चांगली वागणूक मिळाली त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की कुटुंबापासून दूर आहे."

==================

First published: November 4, 2018, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading