'वाराणसीमध्ये खऱ्या आणि खोट्या चौकीदारात लढाई'

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 06:49 PM IST

'वाराणसीमध्ये खऱ्या आणि खोट्या चौकीदारात लढाई'

नवी दिल्ली, 31 मार्च : बीएसएफचे निलंबित जवान तेज बहादूर यादव वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यादव हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. रविवार(31 मार्च) त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पंतप्रधान मोदी निमलष्करी दलाच्या जवानांना निवृत्तीवेतन देणार का?'',असा प्रश्न तेज बहादूर यादव यांनी उपस्थित केला आहे.

''पंतप्रधान मोदींनी जी आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनांचं आजपर्यंत नेमकं काय झालं?. वाराणसीतील ही लढाई बरोबरीची आहे, एकीकडे खरा चौकीदार आहे आणि दुसरीकडे खोटा चौकीदार आहे'', असं म्हणत यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पुढे ते असंही म्हणालेत की ''मला भ्रष्टाचार संपवायचा आहे आणि त्यासाठी निवडणूक लढवायची आहे. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला पण मला निलंबित करण्यात आलं. भ्रष्टाचार संपवणे आणि सुरक्षा दल मजबूत करणे हे माझं लक्ष्य आहे''


TB Yadav (BSF constable who was dismissed from service in '17 after he had released video on quality of food served to soldiers): Contesting as independent candidate from Varanasi. PM had said 'will give status of martyrs to soldiers of paramilitary forces,will give them pension' pic.twitter.com/PuDRIs9DzH
Loading...
कोण आहेत तेज बहादूर यादव?

भारतीय लष्कराला मिळणाऱ्या जेवणावरून तेज बहादूर यादव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. लष्कराच्या शिस्तीचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यादव यांना बीएसएफमधून निलंबित करण्यात आले. या व्हिडीओमध्ये जवानांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचं आणि जवानांना अनेकदा उपाशी झोपावं लागत असल्याचा दावा यादव यांनी केला होता. हे प्रकरण गृह मंत्रालयाकडे पोहोचल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी BSFकडून अहवाल मागवला होता.

वाचा अन्य बातम्या

शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप सोडण्यावर मुलगी सोनाक्षीने दिली ही प्रतिक्रिया

'शरद पवारच नाही तर कुणीही होऊ शकतं पंतप्रधान'


'राहुलचा पराभव करणारच'; या नेत्यानं घेतली शपथ

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...