वाराणसी: अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 'सपा'ने बदलला उमेदवार

वाराणसी: अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 'सपा'ने बदलला उमेदवार

लोकसभा निवडणुकीतील हायप्रोफाईल मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात समाजवादी पक्षाने बीएसएफचे तेज बहादुर यादव यांना उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

वाराणसी, 29 एप्रिल: लोकसभा निवडणुकीतील हायप्रोफाईल मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात समाजवादी पक्षाने बीएसएफचे तेज बहादुर यादव यांना उमेदवारी दिली आहे. वाराणसीमधून अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे.

तेज बहादुर यादव पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. पण आता त्यांना सपाने अधिकृत उमेदवार केले आहे. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीने शालिनी यादव यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण आता वाराणसीतून प्लान चेंज करत सपाने शालिनी यादव यांच्या ऐवजी तेज बहादुर यांना उमेदवारी दिली.

शालिनी या माजी काँग्रेस खासदार आणि राज्यसभा माजी उपसभापती श्यामलाल यादव यांच्या सून आहेत. त्यांनी वाराणसी मतदारसंघातून महापौरांची निवडणूक लढविली होती. शालिनी यांनी सोमवारी एसपीमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना तिकीट देण्यात आलं. पण हा निर्णय आता पक्षाने बदलला आहे.कोण आहे तेज बहादुर यादव

बीएसएफमधील जवान तेज बहादुर यादव गेल्या एक वर्षात चर्चेत आले होते. जवानांना दिले जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खराब असल्यावरून यादव यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अर्थात चौकशीनंतर त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. या निवडणुकीत भलेही माझा पराभव होईल. पण हायप्रोफाईल मतदारसंघातून निवडणू्क लढवल्यामुळे जवानांच्या समस्येवर प्रकाश पडेल असे त्यांचे म्हणणे आहे.

वाराणसीत मोदींच्या विरुद्ध काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय मोदींच्या विरुद्ध अनेक जण लढत आहेत. वारणसीमधून मोदींच्या विरोधात 111 जवान आणि एक निवृत्त न्यायाधिश निवडणूक लढवत आहेत. 2014मध्ये मोदींनी येथून विजय मिळवला होता. तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामुळे केजरीवाल यांची उमेदवारीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. पण यंदा मात्र ही निवडणूक आणखी रंजक होणार आहे.

निवृत्त न्यायाधीश लढणार

कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चिन्नास्वामी स्वामीनाथन कर्णन वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. 2017मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी तुरुंगात जावे लागले होते. आता ते भ्रष्टाचाराची निवडणूक लढवणार आहेत. 2018मध्ये त्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती. 63 वर्षीय कर्णन यांनी सेंट्रल चेन्नई बरोबरच वाराणसीतून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दिल्लीनंतर आता शेतकरी वाराणसीत

मोदींच्या विरोधात वाराणसीतून 111 शेतकरी निवडणूक लढवत आहेत. 2017मध्ये तामिळनाडूच्या 111 शेतकऱ्यांच्या गटाने दिल्लीत आंदोलन केले होते. या गटाचे नेतृत्व पी.अय्यकन्नू करत आहेत.

याशिवाय भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी देखील 30 मार्चला रोड शो करत मोदींच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील फ्लोरोसिस पीडित रुग्णांसाठी काम करणारे वड्डे श्रीनिवासन आणि जलगम सुधीर हे देखील मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहेत. या दोघांचा हेतू लोकांचे लक्ष वेधण्याचा आहे. हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक आणि संकट मोचन मंदिराचे महंत विश्वंबर नाथ मिश्रा हे देखील निवडणूक लढवणार आहेत. मिश्रा यांनी गंगा स्वच्छता अभियानासाठी देखील काम करत आहेत.


VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीबबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या