वाराणसी, 09 मे: क्रिकेट चाहत्यांना आयपीएलमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त सामने पहायला मिळत आहेत. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. पण यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. IPLच्या सामन्यावर लावलेल्या सट्ट्यात सर्व गमावल्याने एका व्यक्तीने 3 मुलींची हत्या करत स्वत: आत्महत्या केली. या घटनेत कुटुंबातील एकच व्यक्ती म्हणजे आई बचावली.
वाराणसीमधील लक्सा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली आहे. दीपक ऊर्फ लड्डू ठेले याचे कपड्यांचे दुकान आहे. पण सट्ट्यामुळे एक आनंदी कुटुंब काही क्षणात संपले. दीपकने IPLमधील सामन्यावर सट्टा लावला होता. या सट्ट्यात तो सातत्याने हारला गेला. या काळात पत्नी माहेरी गेल्यामुळे तिला याची काहीच कल्पना नव्हती. त्याने ३ मुलींना जेवणातून विष दिले आणि त्यांचा जीव घेतला. यानंतर दीपकने स्वत: आत्महत्या केली. या घटनेत निबिया (वय-9), अद्वितीय (वय- 7) आणि रिया (वय-5) यांचा मृत्यू झाला. दीपकची पत्नी माहेरी गेल्यामुळे ती वाचली.
दीपकने सट्ट्यात सर्व काही हारल्यानंतर मुलींची हत्या करण्याच्या एक दिवस आधी पत्नीला माहेरी पाठवले होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दीपक आणि पत्नीमध्ये दररोज वाद आणि भांडण होत असे. भांडण झाल्यामुळेच ती माहेरी गेली होती. कर्जबाजारी झाल्यामुळेच दीपकने हे कृत्य केल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
VIDEO : विदर्भात पुन्हा सूर्याचा प्रकोप, हवामान विभागाने दिला इशारा