अरे देवा! दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...

अरे देवा! दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...

खरंतर थोरा-मोठ्यांच्या पाया पडणं म्हणजे शुभ असतं. पण पाया पडणं एका युवकाला चांगलंच महाग पडलं आहे. त्याला असा काही आशीर्वाद मिळाला की सगळेच हादरून गेले.

  • Share this:

चंदौली (उत्तर प्रदेश), 21 सप्टेंबर : एखाद्याला आपण वाकून नमस्कार केला तर 'सदासुखी राहा', 'यशस्वी होओ' असा आशीर्वाद मिळतो. खरंतर थोरा-मोठ्यांच्या पाया पडणं म्हणजे शुभ असतं. पण पाया पडणं एका युवकाला चांगलंच महाग पडलं आहे. त्याला असा काही आशीर्वाद मिळाला की सगळेच हादरून गेले. चंदौली इथे आरोग्य सेवांची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांना एका मद्यधुंद वॉर्डने पायावर डोकं ठेऊन नमस्कार केला. यानंतर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भोगवाडा इथल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरचा वॉर्ड बॉय अशोक याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशोकने कामावर असताना दारू प्यायली होती. नशेत तो आरोग्य मंत्र्यांच्या पाया पडण्यासाठी गेला. तो खाली वाकताच मंत्र्यांना दारूचा वास आला आणि ते प्रचंड रागावले. त्यांनी तातडीने सीएमओला आरोपीचं मेडिकल करून निलंबित करण्याचे निर्देश दिले. प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता आकाश हा नेहमीच नशेत असतो. आरोग्यमंत्र्यांनी सीएमओ डॉ. आरके मिश्रा यांना आरोपी वॉर्ड बॉयच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर बातम्या - धक्कादायक! पतीचे वार पत्नीने अंगावर झेलले पण दिराने पुसलं कुंकू

शुक्रवारी आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह हे पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर इथल्या राज्य महिला रुग्णालयात पाहणीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी सगळ्या खोलीत स्वच्छतेची व्यवस्था पाहिली. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. महिलांच्या खोलीतसुद्धा आकाश हा वॉर्ड बॉय असाच दारूच्या नशेत जातो. त्यामुळे त्यांची सुरक्षाही राम भरोसे असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, सोशल मीडियावर येणार ही बंधनं

दरम्यान, या पाहणी वेळी मंत्र्यांनी इतर प्रभागांच्या स्थितीचीही तपासणी केली. इथून ते भोगवार गाव इथल्या सामुदायिक आरोग्य केंद्राकडे रवाना झाले. सीएचसी इथे तपासणी दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयात रूग्णांची संख्या कमी होण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तपासणी दरम्यान रुग्णालयांमध्ये होणारी गडबड पाहूनही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

पूर्वांचलमधील पुराबाबत विचारलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले की, पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या परस्पर सहकार्याने बाधित भागाची व्यवस्था केली आहे. ज्याचा शासन स्तरावर वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.

VIDEO : निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Sep 21, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या