नितीन गोस्वामी, चंदौली,13 एप्रिल : संपूर्ण देश कोरोनाविरोधात (Coronavirus) विरोधात लढण्यासाठी एकवटला आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या लढाईमध्ये मदत करत आहे. मोठे उद्योजक, कलाकार, खेळाडू किंवा देशातील इतर सेलिब्रिटींनी कोरोनाविरोधातील या युद्धात आर्थिक साहाय्य केले आहे. त्याचप्रमाणे सरकारकडून जनतेला देखील आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक जण पीएम केअर्स फंड (PM Cares Fund) किंवा मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये अनेक जण आपापला खारीचा वाटा उचलत आहेत. पण काही अशा व्यक्ती यामध्ये मदत करत आहेत, ज्यामुळे त्या असामान्य ठरतात.
(हे वाचा-COVID-19 : 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, पगारात होणार 35 टक्के कपात)
उत्तर प्रदेशमधील चंदौली मध्ये राहणाऱ्या एका दिंव्यांग मुलीने तिचे संपूर्ण दिव्यांग पेन्शन पीएम केअर्स फंडमध्ये दान केले आहे. प्रियंका सिंह नावाच्या या मुलीने तिला मिळालेली अडीच हजाराची पेन्शन तिने पुढचा-मागचा विचार न करता कोरोनबाधितांसाठी दिली आहे. त्यामुळे तिचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
(हे वाचा-सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे भाव)
प्रियंका सिंह चंदौली जिल्ह्यातील ताजपूर या गावात राहणारी आहे. लखनऊमधील शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वास विश्वविद्यालयामध्ये ती बीटीसीचा अभ्यास करत आहे. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रियांका लखनऊहून तिच्या गावी ताजपूरला परत आली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम केअरमध्ये पैसे दान करण्याचं आवाहन केलं त्यावेळी प्रियांकाने देखील या कार्यातील तिचा वाटा उचलला आणि दिव्यांग पेन्शनचे सर्व पैसे दान केले.
2 वर्षांची असताना आईचं छत्र हरपलं
प्रियांका तिच्या चारही बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. जेव्हा ती 2 वर्षाची होती, तेव्हाच तिच्यावरून आईचं छत्र हरपलं होतं. वडील शिवाजी सिंह यांनी सर्व मुलींचा सांभाळ केला. आता प्रियांकाच्या या निर्णयाचा त्यांना खूप अभिमान वाटत आहे. प्रियांकाने नक्कीच अनेकांसाठी आदर्श घालून दिला आहे.
संपादन- जान्हवी भाटकर