50 कोटीमध्ये मोदींना जीवे मारण्याचा कट रचतायत तेज बहादूर - भाजप

50 कोटीमध्ये मोदींना जीवे मारण्याचा कट रचतायत तेज बहादूर - भाजप

तेज बहादूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये त्यांच्या हातात एक दारूचा ग्लास आहे आणि ते दारू पित आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत काही लोकदेखील आहेत.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 06 मे : 'तेज बहादूर 50 कोटींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहेत' अशा वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तेज बहादूर यांच्या या वक्तव्याचा मला धक्का बसल्याचं ट्वीट राव यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी तेज बहादूर यांचा व्हिडिओदेखील वापरला आहे.

तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द झालेल्यामुळे ते असं बोलत असल्याचंही राव म्हणाले. रविवारी तेज बहादूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये त्यांच्या हातात एक दारूचा ग्लास आहे आणि ते दारू पित आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत काही लोकदेखील आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याचं तेज बहादूर यांचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्याआधी पंकज शर्मा यांनी फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केली होती. असं स्पष्टीकरण तेज बहादूर यांनी दिलं. तर दारू पिणं काही चुकीचं नाही आहे असंही तेज म्हणाले. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे याबद्दल तपास सुरू आहे.

हा व्हिडिओ बनवणाऱ्यांनी मला ब्लॅकमेल केलं असल्याचं तेज यांचं म्हणणं आहे. 'दिल्ली पोलिसमधील शिपाई पंकज शर्माने मला 50 लाख दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली होती.' असंही तेज बहादूर म्हणाले.

SPECIAL REPORT : काय आहे प्रिया बापटच्या KISS चा किस्सा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 08:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading