वाराणसी पूल अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत - योगी आदित्यनाथ

हा अपघात मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान घडला आहे. ज्यात तब्बल १8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ५०हून अधिक लोक त्यात अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 16, 2018 10:36 AM IST

वाराणसी पूल अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत - योगी आदित्यनाथ

वाराणसी, 16 मे : वाराणसी इथे कँँट स्टेशन इथे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. हा अपघात मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान घडला आहे. ज्यात तब्बल १8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ५०हून अधिक लोक त्यात अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षित कामामुळे हा पूल कोसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर पूल कोसळल्याच्या जवळपास १.३० तास नंतर रेस्क्यू ऑपरेशनला तिथे सुरुवात झाली असं तिथल्या प्रत्यक्षदर्शियांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्थानिकांत प्रचंड संताप आहे. दरम्यान, यात मोठी जीवित हानी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यात मृतांची संख्याही वाढू शकते.

या पुलाखाली 10 ते 15 गाड्या अडकल्याचा अंजाज वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुख व्यक्त केलं आहे.

या घटनेला जबाबदार असणाऱ्या लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा देण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. या घटनेत आपला जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे. जे या घटनेत मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि जे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत त्यांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Loading...

दरम्यान, या घटनेनंतर अनेक दिग्गज राजकीयांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेवर दुख व्यक्त केलं आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2018 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...