मराठी बातम्या /बातम्या /देश /

'वंदे मातरम्' वरून यूटर्न? शिंदेंकडे इनकमिंग सुरूच, सावरकरांच्या पोस्टरवरुन नवीन वाद TOP बातम्या

'वंदे मातरम्' वरून यूटर्न? शिंदेंकडे इनकमिंग सुरूच, सावरकरांच्या पोस्टरवरुन नवीन वाद TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 15 ऑगस्ट : भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लालकिल्ल्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. यावरुन राष्ट्रवादीने फडणवीस यांना लक्ष्य केलंय. 'वंदे मातरम्' वरून मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी यूटर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. तर सावरकरांच्या पोस्टरवरुन कर्नाटकात वाद निर्माण झाला आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. फडणवीस राजीनामा देतील का? भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लालकिल्ल्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या घराणेशाहीवरच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी निशाणा साधला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'वंदे मातरम्' वरून मुनगंटीवारांचा यूटर्न? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॅलोऐवजी वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावं, असं आवाहन केलं होतं. सुधीर मुनगंटीवार यांच्या या आवाहनामुळे वाद निर्माण झाला होता, यावरून आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् हाच शब्द वापरा, असं म्हणलेलं नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सावरकरांच्या पोस्टरवरुन नव्या वादाला तोंड कर्नाटकातील शिवमोगा शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त अमीर अहमद सर्कलमध्ये वीर सावरकरांचे पोस्टर लावण्यात आले. यानंतर मात्र, एका वादाला तोंड फुटले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अभिनेते शरद पोंक्षे यांचं हिंदू समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले.. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पोंक्षे यांनी घेतलेल्या सावरकरांच्या भूमिकेवरुनही त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा असाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अंबानी कुटुंबाला धमकी देणारा ज्वेलर, दक्षिण मुंबईमध्ये दुकान प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदेंकडे इनकमिंग सुरूच शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं इनकमिंग सुरूच आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

पुढील बातम्या