मराठी बातम्या /बातम्या /देश /

वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात! म्हशींना धडकल्याने काल 'नाक' तुटलं अन् आज..

वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात! म्हशींना धडकल्याने काल 'नाक' तुटलं अन् आज..

सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडला आहे.

सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडला आहे.

सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 7 ऑक्टोबर : मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ला सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा जनावरांनी धडक दिली. मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेला शुक्रवारी कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान हा अपघात घडला. कालच्या (गुरुवारी) अपघातात ट्रेनचं नाक तुटलं होतं.

गुरांना धडकल्याने अपघात..

गुजरातमधील आनंद स्थानकाजवळ शुक्रवारी गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची एका गायीला धडक बसून ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. नव्याने दाखल झालेल्या सेमी-हायस्पीड ट्रेनने काल गुरुवारी चार म्हशींना धडक दिली होती. परिणामी समोरचा भाग बदलावा लागला होता.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ताज्या घटनेत ट्रेनचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. फक्त समोरच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी 3.48 वाजता मुंबईपासून 432 किमी अंतरावर असलेल्या आनंदमध्ये ही घटना घडली. याला दुजोरा देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, “गाडीच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे.” सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा - 'पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट', बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या

30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. देशातील ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे. यापूर्वी, नवी दिल्ली-वाराणसी दरम्यान पहिली वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये चालवण्यात आली होती. यानंतर कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात आली. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे. त्याचा वेग 180 किमी/तास ते 200 किमी/ताशी आहे. येत्या काही दिवसांत त्याचा वेग आणखी वाढू शकतो.

सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

0 ते 160 kmph फक्त 129 सेकंदात ( आधी 145 सेकंड )

रिजेनेरेशन - 35 टक्के ( आधी 29 टक्के )

वातानुकूल यंत्रणा - ऊर्जा वाचविणारी vvvf ड्राईव्ह यंत्रणा ( आधी डायरेक्ट ड्राईव्ह )

रुळांवर 650 मिमी पर्यंत पाणी साचले असल्यास गाडी धावू शकेल ( आधी 400 मिमी पर्यंत )

बॅटरी बॅक अप - 3 तास ( आधी एक तास )

First published:

Tags: Train