वंदे भारत एक्सप्रेस: पहिल्याच फेरीत हायस्पीड ट्रेनचा ब्रेक फेल

वंदे भारत एक्सप्रेस: पहिल्याच फेरीत हायस्पीड ट्रेनचा ब्रेक फेल

वाराणसी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासात ब्रेक फेलचं विघ्न उभं राहिलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 16 फेब्रुवारी : देशातील सर्वात हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हा मान मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर रविवारपासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. सुरूवातीला 'वंदे भारत एक्सप्रेस' ही 'Train -18' नावानं ओळखली जोत होती. ट्रेन वाराणसीवरून दिल्लीकडे येत होती. त्यावेळी दिल्लीपासून जवळपास 200 किमी अंतरावर ट्रेनचे ब्रेक फेल झाले. यावेळी ट्रेनमध्ये काही पत्रकार आणि प्रवाशी देखील होते. त्यावेळी ताशी 130 किमी वेगानं 'वंदे भारत एक्सप्रेस' धावत होती. ब्रेक फेल झाल्यानंतर पत्रकार आणि काही प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करत दिल्लीच्या दिशेनं रवाना करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ट्रेनच्या प्रवासात विघ्न उभं राहिल्याचं पाहायाला मिळत आहे.

कुठे झाला ब्रेक फेल?

वाराणसीहून सकाळी 11 वाजून 19 मिनिटांनी ट्रेन दिल्लीच्या दिशेनं रवाना झाली. पण, ट्रेनच्या काही डब्ब्यांचे ब्रेक फेल आणि लाईट गेल्याचं ट्रेनमधील अधिकाऱ्यांच्या आणि इंजिनिअरच्या लक्षात आलं. त्यावेळी ट्रेन दिल्लीपासून 200 किमी अंतरावर होती. त्यानंतर पर्यायी व्यवस्था करत ट्रेनमधील पत्रकार आणि प्रवाशांना दिल्लीच्या दिशेनं पाठवण्यात आलं.

यापूर्वी ट्रायल दरम्यान ट्रेनवर दगड भिरकवण्याचा प्रकार देखील घडला होता. त्यामुळे ट्रेनच्या खिडकीच्या काचा देखील तुटल्या होत्या.

वंदे भारत एक्सप्रेस आहे तरी कशी?

- देशातील पहिली सर्वात वेगवान आणि इंजिनशिवाय चालणारी रेल्वे.

- मेक इन इंडिया अंतर्गत चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये निर्मिती.

- रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे.

- रेल्वेच्या निर्मितीसाठी 100 कोटी खर्च.

- स्पेनहून मागवण्यात आलेल्या रेल्वेच्या सीट 360 डिग्री अंशामध्ये फिरू शकतात.

- काही भागांची परदेशातून आयात.

- पूर्णता वातानुकुलित रेल्वे.

- रेल्वेला 16 डब्बे असून 1100 प्रवाशी प्रवास करू शकतात.

- पहिल्या डब्ब्यामध्ये ड्रायव्हिंग सिस्टम, त्याच ठिकाणी ४४ सीट्स.

- 130 किमी प्रतितास वेगानं ट्रेन धावू शकते.

VIDEO - 'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण

 

First published: February 16, 2019, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading