मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेस हा मोदी सरकारचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. ही ट्रेन मुंबई आणि गुजरातदरम्यान धावते. मात्र सध्या वंदे भारत ट्रेनला एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे या ट्रेनची आतापर्यंत अनेकदा जनावरांसोबत धडक झाली आहे. या घटनेत ट्रेनचं मोठं नुकसान झाल्याचं देखील पहायला मिळालं. दरम्यान आज पुन्हा एकदा ही ट्रेन जनावराला धडकल्याची घटना घडली आहे. ही ट्रेन गुजरातमधून मुंबईकडे येत असताना वापी-उदवाडादरम्यान हा अपघात घडला आहे.
गुजरातहून मुंबईला येताना अपघात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वंदे भारत ही ट्रेन गुजरातवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. ही ट्रेन गुजरातच्या वापी आणि उदवाडादरम्यान असताना हा अपघात झाला. ट्रेनची जनावरासोबत धडक झाली. या अपघातामध्ये ट्रेनच्या समोरच्या भागाचं थोडं नुकसान झालं. अपघातानंतर 15 मिनिटांनी ट्रेन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
हेही वाचा : दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊद्या; तुम्ही चौकशी कराच, दानवेंचे थेट उदय सामंतांना आव्हान
अपघाताची चैथी घटना
वंदे भापत एक्स्प्रेस आणि प्राण्यांची धडक हे जणू समीकरणच बनलं आहे. आज चौथ्यांदा असा अपघात घडला आहे. यापूर्वी तीनवेळेस या ट्रेनची प्राण्यांसोबत धडक झाली आहे. यावर्षी 6 ऑक्टोबरला म्हशीच्या कळपाला ही ट्रेन धडकली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबरला ट्रेनच्या समोर अचानक गाय आल्यानं अपघात झाला, तर 29 ऑक्टोबरला ट्रेनच्या समोर बैल आल्यानं अपघात झाला होता. आज पुन्हा एकदा असाच अपघात झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Train, Train accident