नवी दिल्ली, 13 डिसेंबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आज तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. केजरीवालांच्या घराबाहेर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले आहेत. यामागे भाजपच्या महिला नेत्या होत्या हे भाजपने मान्य केल्याचा दावा आम आदमीच्या पार्टीने केला आहे. चौकीदारांना कॅमेऱ्यांची कसली भीती? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
याचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये काही महिला तोडफोड करीत असल्याचे दिसून आहे.
मुख्यमंत्री @ArvindKejriwal के घर के बाहर भाजपा नेताओं की तोड़फोड़।
आम आदमी पार्टीकडून घाणरेडे राजकारण केल्याचं भाजपचं म्हणणे आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या महिला नगरसेविकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याआधीच अनेक कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे, असं देखील भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.