Valentine म्हणून प्रेयसीला भेटायला गेला, मुलीच्या कुटुंबीयांनी थेट मंडपात केलं उभं आणि...

Valentine म्हणून प्रेयसीला भेटायला गेला, मुलीच्या कुटुंबीयांनी थेट मंडपात केलं उभं आणि...

या लग्नाचा कुणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील एका खेड्यातून बुधवारी एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे. ऐरवी प्रियकर व प्रेयसीला लग्नासाठी कुटुंबीयांना मनवावे लागले. यामध्ये फारच श्रम करावे लागतात. अनेकदा जात, धर्म, वर्ण, वेतन या मुद्द्यांवरुन लग्न मोडतात. मात्र उत्तर प्रदेशातील एका खेड्यात मात्र अजबच प्रकार समोर आला आहे. प्रियकर त्याच्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता, मुलीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाला पळवून नेले आणि तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांवर केला जात आहे. वृत्तसंस्था आयएएनएसनने दिलेल्या माहितीनुसार, सिरसा कलारचे एसएचओ सौरभ सिंह यांनी बुधवारी सांगितले की, 'ही घटना मंगळवारची आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून असे सांगण्यात आले की, मुलीच्या कुटुंबाने एका युवकाला त्यांच्या घरात ओलिस ठेवले आणि मुलीशी जबरदस्तीने लग्न केले. मात्र घटनास्थळी पोहोचताच कानपूर देहात जिल्ह्यातील नादई गावचा हा तरुण राघवेंद्र सिंह याला सोडविण्यात आले. या युवकाचे वय 23 वर्षे असे सांगितले जात आहे.

बर्‍याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते

मुलीच्या कुटुंबाचा संदर्भ देताना ते म्हणाले, “गेल्या कित्येक वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. परंतु मुलाचे कुटुंबीय त्याचे लग्न इतर ठिकाणी ठरवत होते. यानंतर मंगळवारी हा तरुण आपल्या प्रेयसीला  भेटायला गेला असता मुलीच्या कुटुंबाने मुलाला मारहाण करून त्याला ओलीस ठेवले. आणि तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. इतकचं नव्हे तर कोणीतरी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात एसएचओ म्हणाले, या लग्नाचा कुणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या मुलगी तिच्या पालकांच्या घरी आहे आणि मुलगा त्याच्या घरी गेला आहे. या संदर्भात कुणीही तक्रार नोंदविली नाही. मात्र त्यासंदर्भात काही तक्रार सापडल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल.

First published: February 13, 2020, 3:21 PM IST

ताज्या बातम्या