शांतता राखण्यासाठी पोलिसांनी देवालाच ताब्यात घेतलं!

शांतता राखण्यासाठी पोलिसांनी देवालाच ताब्यात घेतलं!

शांतता राखण्यासाठी पोलिसांनी देवालाच ताब्यात घेतल्याचे तुम्ही कधी ऐकले नसले.

  • Share this:

वैशाली, 13 ऑक्टोबर: सर्वसाधारणपणे एखाद्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून त्या भागातील गुंडांना तडीपार करते किंवा त्यांना ताब्यात घेतले जाते. पण शांतता राखण्यासाठी पोलिसांनी देवालाच ताब्यात घेतल्याचे तुम्ही कधी ऐकले नसले. होय, पोलिसांनी शांतता राखण्यासाठी देवालाच ताब्यात घेतले आहे. बिहारमधील हाजीपूर परिसरात ही घटना घडली आहे.

बिहारमधील हाजीपूर येथे सदर पोलीस ठाण्यात क्षेत्रात एका जागेवरून दोन गटात वाद झाले. वादाचे रुपांतर हिंसक झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना मोठा फौजफाटा बोलवावा लागला. पण परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी तातडीने संबंधित परिसरातील हनुमानाची मूर्ती ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी छावणीचे स्वरुप दिले. दोन गटातील वाद हा जमिनीशी संबंधित होता. ज्या जागेशी संबंधित हा वाद आहे ती जागा एका मठाच्या मालकीची आहे. त्या जागेवर दुसऱ्या एका गटाने हनुमानाची मूर्ती स्थापन केली. संबंधित हुनमानाची मूर्ती रान जानकी मंदिरात घेऊन जाण्याचा प्रयत्न एक गट करत होता. त्यावरून सुरु झालेला वाद हिंसाचारावर पोहोचला. दोन्ही गट एकमेकांना भिडले.

पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले आणि समझावल्यानंतर हनुमानाची मूर्ती पोलीस ठाण्यात आणण्याचा निर्णय घेतला. हाजीपूर परिसरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे त्यामुळे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

'शंभर कोल्हे मिळूनही वाघाची शिकार करू शकत नाही', मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Hanuman
First Published: Oct 13, 2019 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading