रुळावरून घसरले सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे, 7 जणांचा मृत्यू

बिहारच्या हाजीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेचे डबे रुळाखाली घसरले आणि मोठा अपघात झाला.

News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2019 10:04 AM IST

रुळावरून घसरले सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे, 7 जणांचा मृत्यू

बिहार, 03 फेब्रुवारी : बिहारच्या हाजीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेचे डबे रुळाखाली घसरले आणि मोठा अपघात झाला. जोगबनीहून नवी दिल्लीला येणाऱ्या आनंद बिहार-राधीकापूर सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झाला आहे. रेल्वेचे 11 डब्बे रुळावरून घसरले.

हाजीपूर-बछवाडा रेलखंडच्या महनार आणि सहदोई स्टेशन नजिक हा अपघात झाला आहे. रेल्वेचा वेग जास्त होता आणि त्यावेळी अचानक 11 डबे रुळावरून खाली घसरले. या अपघातातमध्ये 7  प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर काही जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

या घटनेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुख: व्यक्त केलं आहे. तर अपघातामध्ये जखमींना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.Loading...


या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि बचावकक्ष घटनास्थळी दाखल झालं आहे. अद्याप अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जखमींना ताबडतोब उपचार देण्यासाठी सोनपूर आणि बरौनीवरून डॉक्टरांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

हा अपघात भीषण होता. त्यामुळे यात मृतांची संख्या वाढणार असल्याची शक्यता पोलीस विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कारण रेल्वेचा वेग जास्त असल्याने डबे एकमेकांवर चढले आहेत. त्यामुळे किती मृत आणि जखमी झाले याचा अंदाज लावता येत नाही.

दरम्यान, अंधार असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. तर एकूणच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेनंतर प्रवाशांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आले आहेत. सोनपुर- 06158221645, हाजीपूर- 06224272230, बरौनी- 06279232222


VIDEO : शरद पवारांच्या उखाण्यावर सुप्रिया म्हणाल्या, 'आज बाबांना घराबाहेर झोपावं लागणार!'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...