वरातीत नाचताना नवरदेवाचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू

स्वतःच्या लग्नाच्या वरातीत नाचताना एका नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमधील बडोद्याच्या रानेळी गावात घडलीये. 9 मे रोजी घडलेली ही घटना आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 06:48 PM IST

वरातीत नाचताना नवरदेवाचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू

12 मे : लग्न म्हणजे दोन जिवांचा मिलाप...आयुष्याची एक नवी सुरुवात...पण गुजरातमध्ये सागर सोलंकी तरुणासोबत नियतीने क्रुर चेष्टा केली. आयुष्याच्या वाटेत सहभागी होणाऱ्या जोडीदाराच्या उंबरठ्यावर असताना या नवरदेवाला मृत्यूने गाठलं.

रानेळी इथं राहणाऱ्या सागर सोलंकी या 25 वर्षीय तरुणाचं 9 मे रोजी लग्न ठरलं होतं. मोठ्या उत्साहात सागरची वरात निघाली. डीजेच्या तालावर ठेका धरत त्याचे मित्र बेभान होऊन नाचत होते. मित्रांच्या या उत्साहात सागरही सहभागी झाला. त्याच्या मित्राने त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. थोड्यावेळानंतर अचानक सागरला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही कळाच्या आता दुसऱ्याच क्षणाला त्यानं मान टाकली. सागरने अचानक मान टाकल्यामुळे मित्र हैराण झाले. त्याला तातडीने खाली उतरवलं.

त्याला लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डाॅक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. बोहल्यावर चढण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी सागरचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. सोलंकी कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...