वाघोडिया, 18 नोव्हेंबर : गुजरातमधील (Gujrat) वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर (Vadodara National Highway) टेम्पो आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी आहे. जखमीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वडोदरा जिल्ह्यातील वाघोडियाजवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सूरत येथील एक कुटुंब आपल्या नातेवाईकांसह पावगड इथं दर्शनाला जात होते. वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोडिया चौकात पोहोचले असता भरधाव आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरसमोर जोरात धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात टेम्पोचा समोरच्या भागाचा चुराडा झाला. टेम्पोमध्ये समोर बसलेले तरुण जागीच ठार झाले. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहे. सर्वजण हे सूरत येथील राहणार होते.
या भीषण अपघातामुळे महामार्गावर रक्ताचा सडा आणि जखमी व्यक्तींच्या आक्रोशामुळे परिसरात सून्न झाला होता. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Saddened by the loss of lives due to a road accident near Vadodara. Instructed officials to do needful. May those who have been injured recover at the earliest. I pray for the departed souls.
या भीषण अपघाताबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांनीही ट्वीट करून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने मदत मिळावी अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
वडोदरा जिल्हाधिकारी शालिनी अग्रवाल यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. सूरत येथून पावगड इथं देवदर्शनासाठी जात असताना आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती शालिनी अग्रवाल यांनी दिली.