मराठी बातम्या /बातम्या /देश /PM मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनचा झाला कायापालट; नवीन रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा, पाहा VIDEO

PM मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनचा झाला कायापालट; नवीन रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा, पाहा VIDEO

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredndra Modi) यांनी लहानपणी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला (Sold tea) होता. त्या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात (Renovation) आला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredndra Modi) यांनी लहानपणी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला (Sold tea) होता. त्या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात (Renovation) आला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredndra Modi) यांनी लहानपणी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला (Sold tea) होता. त्या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात (Renovation) आला आहे.

वडनगर, 17 जुलै: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredndra Modi) यांनी लहानपणी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला (Sold tea) होता. त्या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात (Renovation) आला आहे. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुनर्निर्मित वडनगर रेल्वे स्टेशनचं (Vadnagar Railway station) उद्धाटन केलं आहे. दरम्यान देशाचे नवे केंद्रीय रेल्वे मंत्री ( New Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw Visit) यांनी वडनगर रेल्वे स्थानकाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी रेल्वे इंजीनमध्ये बसून कामाचा आढावा घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ एएनआयनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

नवीन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: रेल्वे इंजिनमध्ये बसून कामाचा आढावा घेतला आहे. दरम्यान त्यांनी वडनगर रेल्वे विभागाची पाहणी केली. लोकोमोटिव्ह पायलटसह रेल्वे इंजीनमध्ये बसून प्रवास करत असताना ते संबंधित व्हिडीओमध्ये दिसले आहेत. 52 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव अधिकारी आणि लोको पायलटासोबत चर्चा करत ट्रेनच्या कामकाजादरम्यान होणार्‍या गैरसोयी आणि तक्रारींबद्दल माहिती करून घेतली. यावेळी त्यांनी लोकोमोटीव पायलटला अनेक प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा-पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा!, खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नूतनीकरण केलेल्या वडनगर रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केलं आहे. याच रेल्वे स्टेशनवर नरेंद्र मोदी एकेकाळी चहा विकायचे. जुने दिवसांच्या आठवणीत रमत मोदींनी नवीन नूतनीकरण केलेले वडनगर स्थानक पाहण्याची इच्छादेखील यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींचे वडील दामोदर दास मोदी यांचा वडनगर स्टेशनवर चहा विकण्याचा छोटासा व्यवसाय होता. लहानपणी नरेंद्र मोदी देखील चहा विकण्यासाठी आपल्या वडिलांना मदत करत असत.

हेही वाचा-गडकरीजी, तुम्ही सर्वात यशस्वी मंत्री आहात, पण... ! माजी मंत्र्याचं पत्र

मोदींनी शुक्रवारी गुजरातमधील 1100 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. या प्रकल्पात वडनगर रेल्वे स्टेशनचा देखील समावेश करण्यात आल्यानं नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. वडनगर हे शहर गुजरातची राजधानी अहमदाबादपासून सुमारे अवघ्या 100 किमी अंतरावर आहे. या रेल्वे स्थानकावर नवीन ब्रॉडगेज लाइनची निर्मिती केल्यानं अहमदाबाद-जयपूर-दिल्ली या मार्गाशी संपर्क करणं सोयीस्कर झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Indian railway, PM Naredra Modi