भारतात इतर देशांतील लशींनांही मिळणार मंजुरी; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

भारतात इतर देशांतील लशींनांही मिळणार मंजुरी; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

देशभरात कोरोना (Corona) बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. या स्थितीत भारतात आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या तीन लशींव्यतिरिक्त परदेशात निर्मित कोरोना लशींना मंजुरी देण्याची प्रक्रिया सरकारने वेगात सुरू केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : देशभरात कोरोना (Corona) बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. या स्थितीत भारतात आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या तीन लशींव्यतिरिक्त परदेशात निर्मित कोरोना लशींना मंजुरी देण्याची प्रक्रिया सरकारने वेगात सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशनने (CDSCO)या प्रक्रियेबाबत नुकतीच माहिती दिली.

या माहितीनुसार, परदेशात निर्मिती करणाऱ्या लशींना आपत्कलीन मंजुरी देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्या परदेशी कंपन्यांना वाटते की त्यांनी तयार केलेल्या लशीला भारतात लसीकरणासाठी परवानगी मिळावी, अशा कंपन्यांनी आपत्कालीन मंजुरीसाठी सीडीएससीओकडे अर्ज करावा. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर डिसीजीआय (DCGI)तीन दिवसांत त्याबाबत निर्णय घेईल.

हे ही वाचा-कोरोना प्रतिबंधक लस घ्या आणि करात सूट मिळवा, या महानगरपालिकेची Idea

जाणून घेऊया ही प्रक्रिया नेमकी कशी आहे...

1) डीसीजीआयची परवानगी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत लशींची ब्रिजिंग क्लिनिकल ट्रायल (Bridging Clinical Trial) घेतली जाणार.

2) सीडीएससीओ नोंदणी प्रमाणपत्र आणि आयात परवान्याची कार्यवाही 3 वर्किंग डेज मध्ये पूर्ण केली जाणार.

3) एनईजीव्हीएसीच्या (NEGVAC) सूचनांनुसार सीडीएससीओ नियम आणि अटी तयार करणार

4) लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीकरिता सीडीएससीओकडे अर्ज करावा लागणार. विदेशी लस निर्माते भारतात अधिकृत एजंट किंवा इंडियन सब्सिडियरीच्या माध्यमातून अर्ज करु शकतात. अर्जाच्या अटी पूर्ण केल्यानंतर सीडीएससीओ लशीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी आवश्यक अखेरची परवानगी डिजीसीआयकडून घेईल.

5) या अटी पूर्ण केल्यानंतर डिजीसीआयची मंजूरी मिळेल. राष्ट्रीय कोविड -19 कार्यक्रमासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही लस वापरली जाईल.

6) 100 लोकांवर लशीचा परिणाम 7 दिवसांपर्यंत मॉनिटर (Monitor)केला जाईल. त्यानंतरच ही लस सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करुन दिली जाईल.

7) विदेशी लशीला परवानगी दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्जदारांना ब्रिजींग ट्रायल सुरु करावी लागेल.

8) ब्रिजिंग ट्रायल प्रोटोकॉल,इंपोर्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इंपोर्ट लायन्सनसह अर्ज दाखल केल्यानंतरच लशीला परवानगी दिली जाईल.

9) विदेशी लशीला डिजीसीआयची मंजुरी मिळाल्यानंतर 3 दिवसांच्या आत अर्जदाराला नोंदणी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सीडीएससीओ सुरु करेल. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी (CDL)कसौलीतर्फे परदेशी लशींच्या सर्व बॅच जारी केल्या जातील.

10) सीडीएलची मंजुरी मिळाल्यानंतर ही विदेशी लस 100 लोकांना देण्यात येईल आणि त्यांचे 7 दिवसांपर्यंत निरीक्षण केले जाईल. या निरीक्षणाचा रिपोर्ट सीडीएससीओला सुपुर्द केला जाईल.

11) 100 लोकांवर लशीचा काय परिणाम दिसून आला या अहवालाचे परीक्षण केल्यानंतरच सीडीएससीओ लसीकरणासाठी लशीला परवानगी देईल.

12) विषय तज्ज्ञ समितीशी सल्लामसलत करुन अर्ज केल्याच्या 7 दिवसांच्या आत ब्रिजिंग ट्रायल प्रोटोकॉल सीडीएससीओ जारी करेल.

13) विदेशी लशीचा ब्रिजिंग ट्रायलचा अहवाल प्रथम सीडीएससीओ आणि त्यानंतर डिजीसीआयला मंजुरीसाठी सोपवला जाईल.

First published: April 15, 2021, 8:34 PM IST

ताज्या बातम्या