तोगडियांचा डाव संपला; विष्णू सदाशिव कोकजे विहिंपचे नवे अध्यक्ष

तोगडियांचा डाव संपला; विष्णू सदाशिव कोकजे विहिंपचे नवे अध्यक्ष

विहिंपच्या 52 वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच अशाप्रकारची निवडणूक घेऊन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे

  • Share this:

14 एप्रिल: आज झालेल्या विहिंपच्या कार्यकारी बोर्डाच्या निवडणुकीत विष्णु सदाशिव कोकजे यांची विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे प्रवीण तोगडिया यांचा डाव आता संपला आहे. विहिंपची पहिल्यांदाच गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली.

विहिंपच्या 52 वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच अशाप्रकारची निवडणूक घेऊन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या मतदानादरम्यान 192 मतांपैकी 131 मतं कोकजेंना तर 61 मतं राघव रेड्डींना मिळाली.

गेल्या डिसेंबरमध्येच तोगडिया आणि रेड्डी यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी २९ डिसेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये बैठक झाली होती. त्यावेळीही कोकजे यांचं नाव विहिंपच्या अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आलं होतं. मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत त्याला विरोध केला होता. त्यामुळे नव्या अध्यक्षाची निवड होऊ शकली नव्हती.

अखेर गुप्त मतदान पद्धतीने कोकजे यांची निवड झालीय.

कोण आहेत व्ही. कोकजे?

-संपूर्ण नाव-विष्णू सदाशिव कोकजे

-जन्म-1939 ,मध्यप्रदेश

-2003 ते 2008 दरम्यान हिमाचल प्रदेशचे राज्यपाल

- मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी प्रभारी न्यायमूर्ती

-भारत विकास परिषदेचे माजी अध्यक्ष

First published: April 14, 2018, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading