'सीता मेरी जान' : 'रामलीले'त रावण झालेल्या भाजप आमदाराच्या डायलॉगने नवा वाद

'सीता मेरी जान' : 'रामलीले'त रावण झालेल्या भाजप आमदाराच्या डायलॉगने नवा वाद

'सीता मेरी जान' म्हणणाऱ्या भाजप आमदारावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष

  • Share this:

देहरादून, 02 सप्टेंबर: उत्तराखंडमधील रुद्रपूरचे आमदार राजकुमार ठुकराल पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. रविवारी रुद्रपूरमध्ये आयोजित केलेल्या रामलीला नाटकादरम्यान ठुकराल यांनी सीतेला 'मेरी जान' असं संबोधल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. रामलीला या नाटकात ठकुराल हे रावणाची भूमिका साकारत असताना हा प्रकार घडला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला मात्र काही क्षणांनंतर त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रामलीला प्रयोगादरम्यान असं नेमकं काय घडलं?

रुद्रपूर इथे रविवारी रामलीला नाटकाचा एक प्रयोग होता त्यामध्ये आमदार राजकुमार ठुकराल रावणाची भूमिका निभावत होते. त्यावेळी साधूचा वेश धारण करून ते सीता मातेजवळ आले आणि म्हणाले, 'तू खूप तरुण दिसत आहेस. तुला पाहून असं वाटतं की तू राजकुमारी आहेस'.

त्यावेळी सीतेनं उत्तर दिलं हो देवा! सीता असं माझं नाव आहे. सीतेनं उत्तर दिल्यानंतर रावणाने म्हणजेच रावणाच्या वेशभूषेत असलेल्या आमदार ठुकराला यांनी 'सीता मेरी जान' असा उल्लेख केला. त्यांच्या या डायलॉगमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र त्या वाक्यामुळे वादाला तोंड फुटले. ठकुराल यांनी असं म्हटल्याची जाहीर कबूली दिली मात्र हा डायलॉग पटकथेत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

ठुकराला यांनी त्यांनी म्हटलेल्या वाक्याची सारवासारव केली आहे. हे वाक्य माझं नसून पटकथेचा भाग होता असं म्हटलं आहे. सीता आणि रामाप्रती माझ्या मनात नितांत आदार आहे. प्रयोगादरम्यान हे वाक्य जेवढ्यावेळी आलं त्यानंतर मी सीता मातेचे स्वत: पाय धरले असं आमदार राजकुमार ठुकराला म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर मात्र विरोधकांनी चांगला निशाणा साधला आहे.

राजकुमार ठुकराला अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली होती. तर उधमसिंह नगर इथे टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्य़ामुळे या वक्तव्यानंतर आता आमदार राजकुमार ठुकराला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 01:44 PM IST

ताज्या बातम्या