Home /News /national /

काका बोलल्याने भडकला दुकानदार; मुलीची केली भयावह अवस्था, वाचूनच उडेल थरकाप

काका बोलल्याने भडकला दुकानदार; मुलीची केली भयावह अवस्था, वाचूनच उडेल थरकाप

कुटुंबीयांना मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करावं लागलंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

    उत्तराखंड, 23 डिसेंबर: उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगरमधील (Udham Singh Nagar) कोतवालीत (Kotwali) असा एक प्रकार समोर आला आहे, जो तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल. येथे एका तरुणीने काका म्हटल्याने दुकानदार (Shopkeeper) इतका संतापला की त्याने मुलीला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर कुटुंबीयांना मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करावं लागलंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील सितारगंजमध्ये मुलीने दुकानदाराला काका म्हटल्याने दुकानदाराने मुलीला बेदम मारहाण केली. काकांनी म्हणताच दुकानदाराचा राग अनावर झाला आणि त्याने मुलीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. ही मुलगी सितारगंजमधील इस्लाम नगर येथील रहिवासी आहे. हेही वाचा-  लज्जास्पद! अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा क्रिकेटपटूवरील आरोप सिद्ध, कोर्टाने सुनावली शिक्षा दुकानात बॅडमिंटन बदलण्यासाठी गेल्याचं मुलीनं सांगितलं आहे. पुढे मुलीनं दुकानदाराला म्हटलं की, काका, या बॅडमिंटनमध्ये काहीतरी कमी आहे, ते बदलून आणि दुसरं द्या', यावर दुकानदार चांगलाच संतापला आणि त्याला बेदम मारहाण करू लागला, असा आरोप मुलीनं आरोप केला आहे. त्याचवेळी सीएससी सितारगंजचे डॉ रवींद्र सिंह यांनी सांगितलं की, मुलगी प्रचंड घाबरली आहे, तिला मारहाण करण्यात आली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून गरज भासल्यास तिला उच्च केंद्रात पाठवलं जाण्याची शक्यता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttarakhand

    पुढील बातम्या