भाजप सरकारमधील मंत्र्याला झाला कोरोना, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळच होणार क्वारंटाइन

भाजप सरकारमधील मंत्र्याला झाला कोरोना, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळच होणार क्वारंटाइन

भाजपचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

देहरादून, 01 जून : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनंतर आता प्रशासकीय यंत्रणा आणि मंत्र्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. भाजपचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतपाल महाराज यांचे रिपोर्ट कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.

सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. रविवारी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत येथे रुग्णांची संख्या 749 वर पोहोचली आहे. रविवारी, आणखी 33 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.

हे वाचा-...तरच सरकारनं लॉकडाऊन हटवावा, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला सल्ला

हे वाचा-महाराष्ट्रावर आणखी एक संकट, या राज्यांना 3 जूनपर्यंत दिला सतर्कतेचा इशारा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 1, 2020, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading