मराठी बातम्या /बातम्या /देश /

संकटावर केली युक्तीने मात, लॉकडाऊनमध्ये नवा उद्योग सुरु करणाऱ्या जिद्दीची गोष्ट!

संकटावर केली युक्तीने मात, लॉकडाऊनमध्ये नवा उद्योग सुरु करणाऱ्या जिद्दीची गोष्ट!

उत्तराखंड (Uttarakhand)  राज्यातल्या ऋद्रप्रयागच्या (Rudraprayag) हरी भाई मलवाल यांनाा लॉकडाऊनमुळे गावी परतावं लागलं. अचानक आलेल्या अडचणीमुळे न डगमगता त्यांनी घरातच स्वत:चा उद्योग सुरु केला आहे.

  • Published by:  News18 Desk

रुद्रप्रयाग, 10 जानेवारी :  काही जण प्रचलित पायवाटेवरुन जातात, तर काही स्वत:ची नवी वाट तयार करतात. कोरोना व्हायरसमुळे (Corona virus) देशभरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले. या लॉकडाऊनचा मोठा फटका उद्योगांना बसला आहे. देशातील अनेकांच्या या काळात नोकऱ्या गेल्या. या मोठ्या संकटामध्येही न डगमगता नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत.

उत्तराखंड (Uttarakhand)  राज्यातल्या ऋद्रप्रयागचे (Rudraprayag) हरी भाई मलवाल हे यापैकीच एक आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अचानक आलेल्या अडचणीनंतर न डगमगडता त्यांनी स्वत: उद्योग सुरु केला.

कसा शोधला मार्ग ?

हरी भाई मलवाल 20 वर्षांपासून सहारनपूरच्या वह्यांच्या कारखान्यात काम करत होते. लॉकडाऊनमुळे त्यांना घरी यावं लागलं. घरी परतल्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी नवा उद्योग करण्याचं ठरवलं. त्यांनी घरातल्या एका छोट्या रुममध्ये कटिंग मशिन आणि स्ट्रॅचिंग मशिन बसवली. या मशिनच्या माध्यमातून त्यांनी वही, रजिस्टर, आर्ट कॉपी यांचं उत्पादन सुरु केलं. घरगुती कारखान्यात तयार झालेलं हे उत्पादन आज ते गावात बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये विकतात. त्याचबरोबर पुस्तकांचं बाईंडिंग करण्याचं कामही ते करतात.

तुम्हीही सुरु करु शकता उद्योग

वह्या तयार करण्याचा कारखाना सुरु करण्यासाठी फार भांडवल लागत नाही. त्यामुळे तो कुणालाही सुरु करणे सहज शक्य आहे.. वह्या तयार करण्यासाठी रॉ मटेरियल म्हणून एका विशिष्ट प्रकारचा कागद आणि पुठ्ठ्याची आवश्यकता असते. या दोन्ही गोष्टी स्थानिक बाजार पेठेतून किंवा ऑनलाईन कमी किंमतीमध्ये खरेदी करणे शक्य आहे. त्याचबरोबर या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनची किंमत 4 ते 6 लाख रुपये इतकी आहे.

कमी भांडवलात चांगले रिटर्न्स देणारा हा उद्योग आहे. हरीलाल यांनी संकटामध्ये न डगमगता गावात हा उद्योग सुरु केला. उत्तराखंडमधील अनेक तरुण नोकरीसाठी राज्याबाहेर जातात. त्यांनी हा ट्रेंड तोडून दुसऱ्या गावातून आपल्या घरी परत येत स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे, त्यामुळे आज ते त्या गावातील तरुणांचा आदर्श बनले आहेत.

First published: