बद्रीनाथ, 08 ऑगस्ट : केरळमधील भूस्खलनानंतर आणखीन एक मोठ्या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तराखंड इथे चमोलीहून बद्रीनाथला महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन झालं आहे. दरम्यान या रस्त्यावरून गाड्यांची वर्दळ सुरू होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्त हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.
डोंगराचा एका मोठा हिस्सा अचानक कोसळून रस्त्यावर आल्यानं नागरिकांची मोठी खळबळ उडाली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेआधी दगड आणि माती हळूहळू खाली येत असल्याचं पाहायला मिळाली. त्यानंतर एक मोठा हिस्सा अचानक रस्त्यावर कोसळला. रस्त्यावर मातीच्या ढीग आल्यानं चमोली- बद्रीनाथ महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आली असून सध्या या मार्गावरील वाहातूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळण्याआधी या मार्गावरून गाड्या जात होत्या. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची अद्याप माहिती समोर आली नाही.
शुक्रवारी केरळमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं 80 मजूर राहात असलेली वस्तू जमीनदोस्त झाल्याची दुर्घटना समोर आली. यामध्ये साधारण 9 ते 10 मजूरांचा मृत्यू झाला असून 10 जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं.