‘लव्ह जिहाद’चा वाद असताना या राज्यांने घेतला मोठा निर्णय, आंतरधर्मिय विवाह करणाऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस

 ‘लव्ह जिहाद’चा वाद असताना या राज्यांने घेतला मोठा निर्णय, आंतरधर्मिय विवाह करणाऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस

ज्यांनी आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशन केलंय अशी जोडपी या योजनेत पात्र ठरणार आहेत. लग्नाच्यानंतर त्यांनी वर्षभराच्या आत त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 नोव्हेंबर: देशात लव्ह जिहादवर (Love Jihad) जोरदार चर्चा सुरू आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा यासारख्या भाजप शासित राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणाही केली आहे. मात्र भाजपचं राज्य असलेल्या उत्तराखंड या राज्याने मात्र आंतरर्धिमिय आणि आंतरजातीय लग्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय. अशी लग्न करणाऱ्यांना रोख 50 हजार बक्षिस सरकार देणार आहे. अशा विवाहांमुळे सामाजिक अभिसरण निर्माण होते त्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण होण्यासही मदत होते या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ज्यांनी आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशन केलंय अशी जोडपी या योजनेत पात्र ठरणार आहेत. लग्नाच्यानंतर त्यांनी वर्षभराच्या आत त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादची चर्चा सुरू असून त्यावरून राजकारणही होत आहे.

Love Jihad ला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध नेहमीचा आहे. लग्नासाठी धर्म बदलायला लावतात, असा त्यांचा आरोप असतो. अशा धर्मांतराला कायद्याने बंदी असावी, अशीही मागणी होत होती. आता प्रत्यक्षात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा (Love jihad law) करण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. शिवराज सिंह चौहान (Shivraj singh chauhan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने असा कायदा आणण्याची तयारी केली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशात योगी सरकारनेसुद्धा लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं.

ट्विटरवर #BoycottNetflixचा ट्रेंड;'अ सुटेबल बॉय'मधील दृश्य पाहून नेटकरी संतापले

मध्य प्रदेशचे (Madhya pradesh) गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी सांगितलं की, विधानसभेच्या येत्या अधिवेशनात शिवराज सरकार धर्म स्वातंत्र्य अबाधित राखणारा कायदा मांडणार आहे. हा कायदा संमत झधाला की, लग्नानंतर धर्मांतर करायला लावणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. लव्ह जिहाद हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची तरतूद त्यात असेल आणि त्यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूदही असेल. लव्ह जिहादमध्येम मुख्य आरोपीलाच नाही, तर त्याचे साथीदार किंवा सहआरोपींनासुद्धा जामीन मिळणार नाही. लग्नानंतर स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्यांनी त्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यासाठी अर्ज करावा लागेल.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली भाजप नेते विखे पाटलांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

असा अर्ज न केल्यास ते सक्तीचं धर्मांतर ठरेल आणि लव्ह जिहादचा प्रयत्न म्हणून या प्रकरणी धर्मांतर करायला लावणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल, असं मध्य प्रदेशचे गृहमंत्री  नरोत्तम मिश्र यांनी सांगितलं. गुपचूप केलेलं लग्न, बळजबरीने केलेलं धर्मांतर हे या कायद्याअंतर्गत रद्दबातल ठरवण्यात येईल.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 22, 2020, 5:41 PM IST
Tags: love jihad

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading