काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; या बडया नेत्याचा राजीनामा

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; या बडया नेत्याचा राजीनामा

Congressमध्ये सुरू झालेलं राजीनाम्यांचं सत्र काही थांबताना दिसत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै : काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनाम्यांचं सत्र काही थांबताना दिसत नाही. काँग्रेसच्या जवळपास 140 ते 150 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरिश रावत यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता हरिश रावत यांच्या रूपानं काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. ‘मला दु:ख आहे की, माझ्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही’ असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यानंतर जवळपास 140 ते 150 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता हरिश रावत यांनी देखील राजीनामा दिला आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला आहे.

राहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय; प्रियांका गांधी म्हणतात 'हिंमत लागते'

राहुल यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. अध्यक्ष म्हणून काँग्रेसची सेवा करता आली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानाची होती. देश आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे, असं ट्विट देखील राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. पण, राहुल गांधी मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. दरम्यान, खूप कमी लोकांकडे असा निर्णय घेण्याचं धाडस असतं. तुमच्या निर्णयांचं मी स्वागत करते, अशा शब्दात प्रियांका गांधी यांना राहुल यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. राहुल यांच्यानंतर प्रियांका यांनी अध्यक्षपद स्वीकारावं म्हणून काँग्रेसमधून आग्रह होता. पण, प्रियांका गांधी यांनी मात्र त्याला नकार दिला. शिवाय, राहुल यांनी देखील काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा असं म्हटलं होतं.

VIDEO: राहुल गांधींना दिलासा; RSS वक्तव्याप्रकरणी कोर्टानं दिला जामीन

First published: July 4, 2019, 12:00 PM IST

ताज्या बातम्या