मराठी बातम्या /बातम्या /देश /

Uttarakhand Election Results 2022: देवभूमीवर कोण करणार राज्य?

Uttarakhand Election Results 2022: देवभूमीवर कोण करणार राज्य?

स्पष्ट बहुमताचं मजबूत सरकार असूनही उत्तराखंडमध्ये गेल्या 5 वर्षांत 3 मुख्यमंत्री पाहिले. भाजप ही देवभूमीची सत्ता राखणार की गमावणार?

स्पष्ट बहुमताचं मजबूत सरकार असूनही उत्तराखंडमध्ये गेल्या 5 वर्षांत 3 मुख्यमंत्री पाहिले. भाजप ही देवभूमीची सत्ता राखणार की गमावणार?

स्पष्ट बहुमताचं मजबूत सरकार असूनही उत्तराखंडमध्ये गेल्या 5 वर्षांत 3 मुख्यमंत्री पाहिले. भाजप ही देवभूमीची सत्ता राखणार की गमावणार?

नवी दिल्ली, 10 मार्च : उत्तराखंड निवडणूक निकाल 2022 (Uttarakhand Assembly Election Result 2022) काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा आहे. देवभूमी नावाने ओळखलं जाणारं हे निसर्गरम्य राज्य भाजप टिकवणार की गमावणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. Exit Polls मध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या निकालाकडे विशेष लक्ष आहे. (Assembly Election Result 2022 live updates)

उत्तराखंडच्या 70 पैकी  31 जागा मिळवणं बहुमतासाठी आवश्यक आहे. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार  भाजपला 26 ते 32, काँग्रेसला 32 ते 38, आप ला 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 उत्तराखंडात होणार का सत्तापालट?

उत्तराखंडच्या 70 जागांसाठी मतदान झालं. उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती.

वाचा : Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स

2017 साली भाजपने 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 11 आणि इतर पक्षांना 2 जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. 4 वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं.

कोरोना व्हायरसमुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांवर बंदी घातली होती, त्यामुळे तिरथसिंग रावत मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य होणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिरथसिंग यांना राजीनामा द्यावा लागला. तिरथसिंग रावत यांच्यानंतर पुष्कर सिंग धामी यांना भाजपने उत्तराखंडचं मुख्यमंत्री केलं. 10 मार्च ते 4 जुलै या 4 महिन्यांच्या काळात भाजपला उत्तराखंडमध्ये 3 मुख्यमंत्री बदलावे लागले.

First published:

Tags: Assembly Election, BJP, Uttarakhand, काँग्रेस