धक्कादायक ! PubG गेमवरून आईवडिलांनी खडसावलं, पाच अल्पवयीन मुलांनी घरच सोडलं

आईवडिलांनी भल्यासाठी पबजी गेम खेळण्यास मनाई केलं कर पाच शाळकरी मुलांनी रागाच्या भरात घरातून पळ काढला.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 02:53 PM IST

धक्कादायक ! PubG गेमवरून आईवडिलांनी खडसावलं, पाच अल्पवयीन मुलांनी घरच सोडलं

देहरादून, 25 जुलै : पबजी गेमनं लहान मुलांसह तरुणांना अक्षरशः वेड लावलं आहे. या गेममुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या डोक्याला ताप झाला आहे. याच पबजी गेमशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईवडिलांनी भल्यासाठी पबजी गेम खेळण्यास मनाई केलं कर पाच शाळकरी मुलांनी रागाच्या भरात घरातून पळ काढला. इतकंच नाही तर या मुलांनी थेट राजधानी दिल्ली गाठली. ही सर्व मुलं वय वर्षे 11 ते 15 वयोगटातील आहेत.  उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील ही घटना आहे. आपली मुलं अचानक बेपत्ता झाल्यानं आईवडिलांना चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या मुलांचा बराच वेळ शोध घेतला, पण मुलांचा काही पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसात मुलं गायब झाल्याची तक्रार नोंदवली.

(वाचा :'ती' दागिने चोरून गिळायची; डॉक्टरांनी पोटातून काढलं दीड किलो सोन)

घटनेचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीनं मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अथक मेहनत घेत पोलिसांनी अखेर या मुलांना सुखरुपरित्या त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात सोपवलं.

यातील एक जण दहावीचा तर उर्वरित सर्व सातवीचे विद्यार्थी आहेत.

(पाहा : VIDEO: सायन-पनवेल महामार्गावर लोखंडी पिलर कोसळला)

Loading...

पोलिसांकडे आलेल्या पाचही तक्रारींमध्ये साम्य

देहरादून शहरातील राजपूर पोलीस स्टेशनमध्ये 11 ते 22 जुलैच्या दरम्यान  मुलं हरवल्याच्या एकूण पाच तक्रारी दाखल आल्या. या पाचही तक्रारींमध्ये पोलिसांना साम्य आढळून आल्यानं त्यांनी पालकांचीच चौकशी केली. या सर्व पालकांनी आपापल्या मुलांना पबजी गेम खेळण्यास सक्त मनाई केली होती, अशी माहिती चौकशीत समोर आली.  यावरून गेम खेळायला मिळत नसल्यानं मुलांनी रागाच्या भरात घर सोडल्याचं दिसून आलं.

(पाहा : VIDEO: सायन-पनवेल महामार्गावर लोखंडी पिलर कोसळला)

असा लागला मुलांचा शोध

घर सोडून गेलेल्या या मुलांनी दिल्ली गाठून तिथल्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावरून मुलांना ट्रॅक करून त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना मोठी मदत मिळाली. यानंतर तीन पोलीस अधिकाऱ्यांचं पथक दिल्लीत दाखल झालं आणि त्यांनी मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केलं.

VIDEO: महापालिकेचा बेजबाबदारपणा! उघड्या गटारात पडली महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...