Home /News /national /

...तर ममता बॅनर्जींनाही द्यावा लागेल उत्तराखंडच्या CM प्रमाणे राजीनामा!

...तर ममता बॅनर्जींनाही द्यावा लागेल उत्तराखंडच्या CM प्रमाणे राजीनामा!

उत्तराखंडचे मुख्यमंत्री (Uttarakhand CM) तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी शुक्रवारी रात्री उशीरा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना धोक्याचा इशारा मिळाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 जुलै :  उत्तराखंडचे मुख्यमंत्री (Uttarakhand CM) तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी शुक्रवारी रात्री उशीरा राजीनामा दिला आहे.  तिरथ सिंह राव उत्तराखंड विधानसभेचे सदस्य नाहीत. तसेच कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये राज्यातील एखाद्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. रावत यांचा राजीनामा हा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. काय आहे कारण? राज्यघटनेच्या कलम 164-अ नुसार मुख्यमंत्र्यानं 6 महिन्याच्या आत विधिमंडळाचा (विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य होणं अपेक्षित आहे. रावत यांनी 10 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना 10 सप्टेंबर 2021 पर्यंत आमदार होणे आवश्यक होते.  मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यात कोणत्याही सभागृहाचे सदस्य होता आले नाही तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. उत्तराखंडमध्ये विधानपरिषद नाही. तसंच आगामी दोन महिन्यात कोरोना विधानसभेची पोटनिवडणूक घेणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे रावत यांना राजीनामा द्यावा लागला. आता बंगालमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दणदणीत बहुमत मिळाले. पण त्या स्वत: नंदीग्राम विधानसभा  मतदारसंघात पराभूत झाल्या. या पराभवानंतरही बॅनर्जी यांनी 4 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  ममता बॅनर्जींनी त्यांच्या निवडणुकीसाठी भवानीपूरच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावत ती जागा रिकामी केली आहे. बारावीच्या परीक्षेबाबत मंडळानं घेतला मोठा निर्णय; 'हे' विद्यार्थी होणार नापास नियोजित वेळेत निवडणुका झाल्या तरच ममता बॅनर्जी भवानीपूरच्या आमदार होऊ शकतात. कोरोनामुळे निवडणूक आयोगानं सर्वच पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे 4 नोव्हेंबर 2021 पर्यंत भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर ममता बॅनर्जी यांनाही तिरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mamata banerjee, Uttarakhand, West bengal

    पुढील बातम्या