मराठी बातम्या /बातम्या /देश /

Uttarakhand Bus accident: उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Bus accident: उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

Bus accident : बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

देहरादून, 31 ऑक्टोबर : उत्तराखंडमध्ये बसला भीषण (Uttarakhand bus accident) अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून 11 प्रवाशांचा मृत्यू झाला (11 people died) आहे. तर इतरही काही जण जखमी झाले आहेत. देहरादून (Dehradun) येथील विकासनगर परिसरातील बुल्हाड बायला रोडवर हा भीषण अपघात (bus accident at bulhad - Baila Road in Dehradun) झाला आहे. बस दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुल्हाड बायला रोडवरुन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस, एसडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. अपघाताची सर्वप्रथम माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने हा अपघात झाला आहे. बस लहान होती आणि त्यातून 25 प्रवासी प्रवास करत होते. ज्या मार्गावरुन बस धावत होती त्या मार्गावर जास्त गाड्या धावत नसल्याने बसमध्ये क्षमतेहून अदिक प्रवासी प्रवास करत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातात मृत्यू झालेले सर्व 11 जण हे एकाच गावातील निवासी होते. हे नागरिक कुठल्या गावातील निवासी होते तसेच ते कुठे चालले होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली

जम्मू-काश्मीरमध्ये 28 ऑक्टोबर रोजी एका बसचा भीषण अपघात झाला होता. थाथरीहून डोडाकडे जाणारी मिनी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली होती. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. आता रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं की, जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे थाथरीजवळ झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीशोक व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, 'ही घटना अत्यंत दुख:त आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात-लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

लखनऊमध्ये बस आणि ट्रक अपघातात 13 जणांचा मृत्यू

7 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. उत्तरप्रदेशातील लखनऊ शेजारील बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यातील बबुरिया गावाजवळ हा अपघात झाला होता. या अपघातात घटनास्थळीच 13 जणांचा मृत्यू झाला होता. तर 25 प्रवासी जखमी झाले होते. दिल्लीहून बहराईचच्या दिशेने डबल डेकर बस जात होती. त्याच दरम्यान बाराबंकी जिल्ह्यातील देवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बबुरिया गावाजवळ बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली.

First published:

Tags: Accident, Uttarakhand