देहरादून, 08 जून : उत्तराखंडमधील औली भाग सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, या भागात होणाऱ्या लग्नासाठी तब्बल 200 हेलिकॉप्टर बुक करण्यात आली आहेत. या लग्नाचा खर्च हा 200 कोटी होणार असून अनेक व्हिआयपी आणि सिने स्टार देखील या लग्नाला हजर राहणार आहेत. एका परदेशी कंपनीचे तब्बल 800 कर्मचारी लग्नाची तयारी करण्यासाठी औलीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या लग्नाचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. दिल्लीवरून देहरादूनला येण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, या पाहुण्यांना हिमालयामध्ये देखील फिरवलं जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान हे लग्न होणार आहे.
कुणाचं आहे लग्न
दक्षिण आफ्रितेतील गुप्ता बंधूंच्या दोन मुलांचं लग्न हे औली येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये गुप्ता बंधूचा मुद्दा हा अग्रभागी होता. 18 ते 22 जून दरम्यान हे लग्न होणार आहे. या लग्नादरम्यान डोंगर- दऱ्यांमध्ये असलेल्या दुकानांना देखील सजवलं जाणार आहे. कारण, फिरायला आलेल्या पाहुण्यांना खाण्यामध्ये काहीही समस्या निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे.
का आहे लग्नाची चर्चा
लग्नाचा एकूण खर्च 200 कोटी
स्वित्झर्लंडमधून मागवण्यात आली 5 कोटींची फुलं
बॉलिवुडमधून अभिनेते, लेखक, निर्माता देखील राहणार हजर
18 ते 22 जून दरम्यान होणार लग्न
अजय गुप्तांचा मुलगा सुर्यकांतचं लग्न पहिलं होणार. त्यानंतर अतुल गुप्तांचा मुलगा शशांकचं लग्न होणार.
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी